पोलीस चौकीचं हॉटेल बनलं, लोणावळ्यातील पीआयचा कारनामा

पुणे : लोणावळ्यात एक पोलीस चौकी बळकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एका पोलीस निरीक्षकावरच याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जागांचे गैरव्यवहार, घोटाळे हे काही नवीन नाहीत. त्यातच आता चक्क पोलीस चौकीच बळकावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या पोलीस निरीक्षकांवर याचा आरोप आहे, त्यांनी ही अनधिकृत पोलीस चौकी उभारली. नंतर ती एका …

पोलीस चौकीचं हॉटेल बनलं, लोणावळ्यातील पीआयचा कारनामा

पुणे : लोणावळ्यात एक पोलीस चौकी बळकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एका पोलीस निरीक्षकावरच याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जागांचे गैरव्यवहार, घोटाळे हे काही नवीन नाहीत. त्यातच आता चक्क पोलीस चौकीच बळकावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या पोलीस निरीक्षकांवर याचा आरोप आहे, त्यांनी ही अनधिकृत पोलीस चौकी उभारली. नंतर ती एका महिलेच्या नावावर केली. इतकंच नाही तर त्यात हॉटेलही सुरु केलं. भविष्यात ही महिला या पोलीस चौकीच्या इमारतीवर हक्क सांगू शकेल. हा त्यामागचा उद्देश असू शकतो. असा ठपका चौकशी अहवालात संबंधित पोलीस निरीक्षकावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील हे 2014 ते 2016 पर्यंत लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख होते. लोणावळ्यातील वळवण येथे पाटील यांनी ही पोलीस चौकी उभारली. पण या पोलीस चौकीवर एका महिलेच्या नावाचा बोर्ड आहे. पोलीस चौकीवरच नाही तर, नगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स/मिळकत कर आणि वीज बीलावरही याच महिलेचं नाव आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या अहवालात आय. एस. पाटील यांच्यावर हा आरोप केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी हा सर्व प्रकार उजेडात आणला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आय. एस. पाटील यांची चौकशी होऊन कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे.

ही पोलीस चौकी अनधिकृतपणे उभारण्यात आली. पोस्ट ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवास्थानासाठी ही जागा राखीव आहे. त्याचीही तक्रार पोरवाल यांनी केली. त्याचबरोबर, पोलीस चौकी उभारण्यासाठी आय. एस. पाटील यांनी मोठा निधी गोळा केल्याचा पोरवाल यांचा आरोप आहे. इतकंच नाही तर या पोलीस चौकीत थेट हॉटेल थाटण्यात आलं होतं आणि बेड ही टाकण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या या कारनाम्याची तक्रार राज्य पोलीस प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. प्राधिकरणाच्या आदेशाने पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली. त्यात आय. एस. पाटील यांनी पदाचा आणि अधिकाराचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील सध्या इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा अहवाल पाठवण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *