लॉकडाऊनपूर्वी भाजी-पाला खरेदीच्या सूचना, पुण्यात वाईन शॉप्सबाहेर झुंबड

पुण्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासातच मद्यप्रेमींची वाईन शॉप्सबाहेर झुंबड बघायला मिळाली (Long queues outside liquor shop in Pune).

लॉकडाऊनपूर्वी भाजी-पाला खरेदीच्या सूचना, पुण्यात वाईन शॉप्सबाहेर झुंबड
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 8:11 PM

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 13 जुलै ते 23 जुलैदरम्यान असेल. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू, भाजीपाला खरेदी करुन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासातच मद्यप्रेमींची वाईन शॉप्सबाहेर झुंबड बघायला मिळाली. मद्य खरेदीसाठी लोकांच्या वाईन शॉप्सबाहेर लांबच लांब रांगा लागल्या (Long queues outside liquor shop in Pune).

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, प्रशासन, डॉक्टर आणि नर्सेस प्रचंड मेहनत घेत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र, 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होताच वाईन शॉप्सबाहेर झालेली गर्दी चिंता वाढवणारी आहे. या गर्दीतील लोकांकडून सोशल डिस्टिंगच्या नियमांचे पालन होताना दिसले नाही (Long queues outside liquor shop in Pune).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत पुण्यात अनेक नियमांमध्ये शिथिलता दिली. मात्र, अनेक नागरिक नियमांचं पालन करत नसल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्याऐवजी वाढत गेला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला. नागरिकांनी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करुन ठेवाव्यात, असं अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, मद्यप्रेमी पुणेकरांनी लॉकडाऊन जाहीर होताच वाईन शॉप्सबाहेर गर्दी करायला सुरुवात केली.

पुण्यात सोमवार 13 जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल, दवाखाने आणि दूध सुरु राहील. अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोलीस आयुक्तालय परिसरात लॉकडाऊन लागू असेल. 22 गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. एखाद्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण असतील, तर पूर्ण लॉकडाऊन करणार, मात्र उद्योग पूर्ण बंद करायचे नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे-पिंपरी, ठाणे ते नांदेड, कुठे-कुठे लॉकडाऊन वाढवला? काय सुरु, काय बंद?

महाराष्ट्रात आणि देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. हा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरु करण्यात आला होता. 25 मार्च ते 14 एप्रिल हा लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. त्यानंतर 15 एप्रिल ते 3 मे हा लॉकडाऊनचा दुसरा टप्पा होता. या दोन्ही टप्प्यांमध्ये संपूर्णपणे संचारबंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं आणि उद्योगधंदे बंद होती.

दरम्यान, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर वाईन शॉप्सवर तळीरामांच्या अक्षरशः उड्या पडताना दिसल्या होत्या. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मद्यप्रेमींना वाईन शॉप्सबाहेर प्रचंड गर्दी केली होती. आतादेखील पुण्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर मद्यप्रेमींची तुफान गर्दी वाईन शॉप्सबाहेर बघायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?.