पुण्यातील पाटील वसाहतीत 10 सिलेंडरचे स्फोट, भीषण अग्नितांडव

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील पाटील वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, आगीची तीव्रता भीषण असून, संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य दिसत आहे. गेल्या दोन तासांपासून हा आगडोंब सुरुच आहे. आग विझवण्यासाठी अजून दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे. MAP : कुठे आहे पाटील …

Pune, पुण्यातील पाटील वसाहतीत 10 सिलेंडरचे स्फोट, भीषण अग्नितांडव

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील पाटील वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, आगीची तीव्रता भीषण असून, संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य दिसत आहे. गेल्या दोन तासांपासून हा आगडोंब सुरुच आहे. आग विझवण्यासाठी अजून दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे.

MAP : कुठे आहे पाटील वसाहत?

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. पुणे महापालिकेने या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी तात्पुरतं राहण्यासाठी हॉलची व्यवस्था केली आहे.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे :

10 सिलेंडरचे स्फोट

अनेक झोपड्या जळून खाक

30 पेक्षा जास्त फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी

100 पेक्षा जास्त टँकर घटनास्थळी

आग विझवण्यास आणखी 2 तास लागणार

पाटील वसाहतीत 2 ते 3 हजार लोक राहतात

पाटील वसाहतीत दोन ते तीन हजार लोक राहत असल्याची माहिती मिळत असून, या भीषण आगीत बऱ्याच झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीत 10 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आग भडकण्यास सुरुवात झाली.

अग्निशमन दलाच्या 30 पेक्षा जास्त गाड्या आणि 100 पेक्षा जास्त टँकर आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.

आगीचे विधानसभेत पडसाद

पुणे आगीचे विधानसभेत पडसाद उमटले असून, पाटील इस्टेटला लागलेल्या आगीबाबत सरकारनं तातडीनं निवेदन करावं, अशी मागणी भाजप आमदार विजय काळे यांनी विधानसभेत केली.

VIDEO : पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *