पुण्यातील भाजप नगरसेवक गोळी लागल्याने जखमी, मांडीतून गोळी आरपार

पुणे : भाजपचे पुण्यातील स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. गणेश बीडकर हे शिक्रापूरजवळ आपटी गावात 35 एकर जागेत असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी सुटल्याचं सांगितलं जातंय. मांडीतून गोळी आरपार गेल्याने हा प्रकार नक्की कशामुळे घडला असावा याबद्दल तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. पिस्तुल साफ करताना …

, पुण्यातील भाजप नगरसेवक गोळी लागल्याने जखमी, मांडीतून गोळी आरपार

पुणे : भाजपचे पुण्यातील स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. गणेश बीडकर हे शिक्रापूरजवळ आपटी गावात 35 एकर जागेत असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी सुटल्याचं सांगितलं जातंय. मांडीतून गोळी आरपार गेल्याने हा प्रकार नक्की कशामुळे घडला असावा याबद्दल तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.

पिस्तुल साफ करताना मिसफायर झाल्याने ही गोळी लागली. जखमी बीडकर यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बीडकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. गोळी लागताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

कोण आहेत गणेश बीडकर?

पुणे महापालिका निवडणुकीत गणेश बीडकर यांचा पराभव झाला होता. पण भाजपने त्यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलं. 2012 च्या पुणे महापालिका निवडणुकीत गणेश बीडकर निवडून आले होते आणि ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. गणेश बीडकर हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *