Pune Corona : पुण्यात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होणार, राज्यातील सर्वाधिक चाचण्या पुण्यात

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत (Corona patient increase Pune) आहे.

Pune Corona : पुण्यात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होणार, राज्यातील सर्वाधिक चाचण्या पुण्यात

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत (Corona patient increase Pune) आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला आहे. शहरात दर दहा लाख लोकांमध्ये 30 हजार तपासण्या होत (Corona patient increase Pune) आहेत.

राज्यात आणि देशात होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. राज्यात पुण्याखालोखाल कोरोना चाचणी करण्याच्या प्रमाणात मुंबईचा क्रमांक आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुणे शहरातील कोरोना बधितांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 2 लाख 33 हजार 254 नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. यामध्ये 73 हजार 383 नागरिक ‘हाय रिस्क’ गटातील आहेत. तर, 1 लाख 59 हजार 871 नागरिक ‘लो रिस्क’ गटातील आहेत.

गेल्या चार आठवड्यात वाढलेले स्वाब टेस्टचे प्रमाण

8-14 जून- 12, 735

15-21 जून 15, 754

22-28 जून 20, 824

29 जून 05 जुलै 24, 813

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 599 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असली तरीही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | नऊ दिवसात 34,105 रुग्णांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 599 वर

एकाच कुटुंबाचा शासकीय लॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, खासगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह, ठाणे महापालिकेविरोधात मनसे आक्रमक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *