मुंबई ते पुणे आता हेलिकॉप्टर टॅक्सी, प्रवास फक्त 20 मिनिटांवर

पुणे : मुंबई-पुणे-मुंबई आणि पुणे-मुंबई-पुणे हा प्रवास आज लाखो लोकांची गरज बनली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास दैनिक स्वरुपात करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यासाठी केवळ 15 मिनिटांत मुंबईहून पुणे गाठणाऱ्या हायपरलूप तंत्रज्ञानाची रेल्वे सुविधा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातच, आता आगामी वर्षात मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी ‘हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा’ सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ 20 …

मुंबई ते पुणे आता हेलिकॉप्टर टॅक्सी, प्रवास फक्त 20 मिनिटांवर

पुणे : मुंबई-पुणे-मुंबई आणि पुणे-मुंबई-पुणे हा प्रवास आज लाखो लोकांची गरज बनली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास दैनिक स्वरुपात करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यासाठी केवळ 15 मिनिटांत मुंबईहून पुणे गाठणाऱ्या हायपरलूप तंत्रज्ञानाची रेल्वे सुविधा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातच, आता आगामी वर्षात मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी ‘हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा’ सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ 20 मिनिटांत आता मुंबईहून पुण्याला पोहोचता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र 20 मिनिटांत हे अंतर कापने शक्य नाही. यासाठी कमीतकमी एक तास लागू शकतो. मुंबई-पुणे हे अंतर अंदाजे 75 नोटिकल इतकं आहे. हे अंतर हेलिकॉप्टर ने पाऊण तासात कापता येतं. या प्रवासासाठी 15 हजार ते 18 हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो.

अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्यासह शिर्डी आणि इतर जवळील ठिकाणांवरही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीने भारतातील एका कंपनीसोबत करार केला आहे. ‘ब्लेड इंडिया’ नावाने ही कंपनी सुरू करण्यात येत आहे. मुंबईतील जुहू आणि महालक्ष्मी परिसरातून हे हॅलिकॉप्टर उड्डाण घेईल. त्यानंतर, केवळ 20 मिनिटांत ते हेलिकॉप्टर पुण्यात पोहोचेल.

यापुर्वी बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात आली. त्यामुळे शहरातील प्रवाशांना 15 मिनिटांमध्ये विमानतळावरुन घरी जाण्यासाठी तसेच तेथून घरी येणे सोपे झाले आहे. त्याच धर्तीवर मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई वाहतूक सेवांचा वाढता अंदाज घेत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *