बारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि खूनाची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात ही हत्या झाली. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19) असे मुलीचे नाव आहे. ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, मुलगा तिला नांदवायला नेत …

बारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि खूनाची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात ही हत्या झाली. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19) असे मुलीचे नाव आहे.

ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, मुलगा तिला नांदवायला नेत नव्हता. त्यामुळे मुलीने नवऱ्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. आईनेही मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मुलगी माहेरीच राहात होती.

दरम्यान, यामुळे मुलगी ऋतुजा आणि आई संजीवनी हरीदास बोभाटे यांच्यात सारखे वाद व्हायचे. कधी कधी इतर शुल्लक घरगुती कारणांनीही भांडणे व्हायची. हत्येच्या दिवशी देखील मुलीत आणि आईत भांडण झाले. अखेर संतापलेल्या आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर आई संजीवनी बोभाटे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *