राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष, सर्व जबाबदाऱ्या मराठा नेत्यांनाच, पवारांना निनावी पत्र

पुणे शहराध्यक्ष, खासदार, पक्ष प्रवक्ता, महापालिका विरोधी पक्षनेता आणि आठ विधानसभा अध्यक्षांपैकी सात अध्यक्ष मराठा आहेत. त्यातच पुन्हा नव्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही मराठा समाजातील कार्यकर्त्यांना दिल्याचा पत्रात आरोप करण्यात आलाय.

राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष, सर्व जबाबदाऱ्या मराठा नेत्यांनाच, पवारांना निनावी पत्र

पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसवर लेटर बॉम्ब (Letter to NCP) टाकण्यात आलाय. राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष असल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र (Letter to NCP) पाठवण्यात आलंय. पुणे शहराध्यक्ष, खासदार, पक्ष प्रवक्ता, महापालिका विरोधी पक्षनेता आणि आठ विधानसभा अध्यक्षांपैकी सात अध्यक्ष मराठा आहेत. त्यातच पुन्हा नव्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही मराठा समाजातील कार्यकर्त्यांना दिल्याचा पत्रात आरोप करण्यात आलाय.

राष्ट्रवादी पक्ष हा मराठा समाजाचा आहे. इतर जाती-धर्मातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात कुठे स्थान नाही हे दाखवून दिल्याबद्दल आभार, असाही पत्रात उल्लेख आहे. पवार साहेब उठता-बसता फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेतात. मात्र ही त्यांची इच्छा की पक्ष एकाच जातीच्या अधिपत्याखाली उंचावून संपून टाकायचा, असा सवाल पत्रातून करण्यात आलाय. यावर त्वरित उपाययोजना झाली नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर पक्षसंघटना कोमात जाईल, असा इशाराही पत्रात देण्यात आलाय.

पक्षात पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या या मेरीटवर होतात आणि सर्व समाज आणि सर्वधर्मीय प्रतिनिधित्व आहे. मात्र असं काही असेल तर याची शहानिशा करुन समतोल साधण्याचा प्रयत्न करु करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी म्हटलंय.

पूर नियंत्रण करण्यात सरकार फेल झालंय. युतीवर सर्वांनी ताशेरे ओढले असून याला छेद देण्यासाठी आणि जनतेचं लक्ष भाजप विचलित करत आहे. भाजप आणि आरएसएस यांचं काम असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष अंकुश काकडे यांनी केला आहे. मात्र पत्राच्या खोलात जाऊन चौकशी करु, पक्षात जातीचा विचार केला जात नाही, या पत्राने पक्षाला काही धोका नसल्याचं काकडे यांनी म्हटलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *