राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचाही लॉकडाऊनमध्ये प्रवास, प्रांतांच्या पत्राचा दाखला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाने प्रांताधिकाऱ्यांचं (Nitin Bhosale Lockdown journey) कथित पत्र दाखवून पुणे-मुंबई असा प्रवास केला

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचाही लॉकडाऊनमध्ये प्रवास, प्रांतांच्या पत्राचा दाखला
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 8:51 PM

पुणे : लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाने केलेला प्रवास चर्चेत असताना, तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाने प्रांताधिकाऱ्यांचं (Nitin Bhosale Lockdown journey) कथित पत्र दाखवून पुणे-मुंबई असा प्रवास केला. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी हे पत्र आपण दिलंच नसल्याचं स्पष्ट केल्याने, या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊन नितीन भोसले यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास केला.(Nitin Bhosale Lockdown journey)

नितीन भोसले यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या नातेवाईकाला आणण्यासाठी 8 एप्रिलला पुणे-मुंबई असा प्रवास केला. त्यासाठी मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी प्रवास करण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. मात्र, आपण पत्र दिले नसल्याचा स्पष्टीकरण संदेश शिर्के यांनी दिल्याने, भोसले यांच्याभोवती संशयाचे ढग आहेत.

नितीन भोसले यांच्यासह चार जणांनी प्रवास केल्याचं समोर आलं आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी आपण पत्रच दिलं नसल्याचं म्हटलं आहे.

प्रांताधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या सहीचं हे पत्र आहे. मात्र आपण असं पत्रच दिलं नाही. माझ्या कार्यालयातील कोणी क्लार्कने जर असं पत्र दिलं असेल, तर मी माहिती घेऊन कारवाई करेन, असं संदेश शिर्के यांनी म्हटलं.

आमदार अनिल भोसले कारागृहात राष्ट्रवादी विधानपरिषदेचे आमदार असलेले अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळाप्रकरणात येरवडा जेलमध्ये आहेत. अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.