दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली

पुणे : पुण्याजवळील तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अचानकपणे 200 ते 300 वर्षे जुनी चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आहे. सेकंड होमसाठी प्रसिद्ध असलेल्या तळेगावची अनेक वैशिष्ट्य आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतोय. तलावातील गाळ काढत असतानाच एक जुनी विहीर सापडली, जो चर्चेचा विषय बनलाय. सध्या ज्या तळ्याचं …

Talegaon old well, दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली

पुणे : पुण्याजवळील तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अचानकपणे 200 ते 300 वर्षे जुनी चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आहे. सेकंड होमसाठी प्रसिद्ध असलेल्या तळेगावची अनेक वैशिष्ट्य आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतोय. तलावातील गाळ काढत असतानाच एक जुनी विहीर सापडली, जो चर्चेचा विषय बनलाय.

Talegaon old well, दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली

सध्या ज्या तळ्याचं काम सुरु आहे, याच तळ्यात पूर्वी सात विहिरी असल्याचा दावा पूर्वजांनी केल्याचं नागरिक सांगतात. सरकारवर अवलंबून न राहता या विहिरीची दुरुस्ती करण्याचा संकल्प तळेगावकरांनी केलाय. टीबीच्या रुग्णांसाठी तळेगावमध्ये पोषक वातावरण असल्याचं सांगितलं जातं. लोकमान्य टिळकांनी एक-एक रुपया जमा करत काच कारखाना उभारला तो याच तळेगावात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही काही काळ तळेगावात वास्तव्य असल्याचं नागरिक सांगतात.

Talegaon old well, दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली

पाण्याची समस्या असताना अशा प्रकारे अचानकपणे पाण्याची विहीर सापडावी ही आनंदाची आणि कुतूहलाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक शहरातील नागरिकांमध्ये या गोष्टीविषयी तर कुतूहल आहेत, पण आता नगरपालिकेने या विहिरीचं जतन करण्याची गरज आहे. जेणेकरुन यापुढेही या विहिरीची मदत होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *