निसर्ग चक्रीवादळाचा फटका, पुण्याजवळ तब्बल 540 वीज वाहिन्यांचा पुरवठा बंद

पुण्यात अनेक ठिकाणी वादळात विजेचे खांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडं वीजयंत्रणेवर कोसळली.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका, पुण्याजवळ तब्बल 540 वीज वाहिन्यांचा पुरवठा बंद
Follow us
| Updated on: Jun 03, 2020 | 10:40 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात आज (3 जून) सुरु असलेल्या ‘निसर्ग’ (Nisarga Cyclone Effect On Electricity) वादळाच्या थैमानात वीजयंत्रणा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी वादळात विजेचे खांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडं वीजयंत्रणेवर कोसळली. यात पुण्यातील जवळपास 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडल्याची प्राथमिक माहिती (Nisarga Cyclone Effect On Electricity) आहे.

दुसरीकडे वादळाच्या पार्श्वभूमीवर मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. संभाव्य नुकसानीचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पुणे शहराच्या विविध भागात आणि पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात महावितरणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप याची निश्चित माहिती मिळणे बाकी असून गुरुवारी (4 जून) सायंकाळपर्यंत हे स्पष्ट होईल असा अंदाज आहे. महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामं करत आहेत. आज रात्री उशिरापर्यंत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु राहणार आहेत (Nisarga Cyclone Effect On Electricity).

मावळ, खेड तालुक्यांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व 215 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वादळासह पावसाचे थैमान सुरु असल्याने वीजवाहिन्या पूर्ववत करण्याच्या कामात काही अडथळे येत होते. त्यामुळे अद्याप या भागातील वीज खंडीतच आहे.

पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद झाला होता. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर या भागांतील जवळपास 112 वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा बंद झाला.

पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज इत्यादी भागांचा समावेश आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ मुंबई, ठाणे, माळशेज घाट जुन्नर मार्गे उत्तर महाराष्ट्रातून पुढे सरकत आहे. या निसर्ग चक्रीवादळाने पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या चक्रीवादळाने अनेक शाळा, समाज मंदीर, घरांचे पत्रे उडून गेले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. केळी, डाळींब, द्राक्ष, ऊस, आंबे यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा शेतकरी पुन्हा एकदा या नैसर्गिक संकटांने हतबल झाला आहे.

पुण्यावरुन पुढं गेल्यावर वादळाची तीव्रता कमी झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढच्या 3 तासात वादळाचा प्रभाव कमी होणार आहे. मुंबईपासून 90 किमी आणि पुण्यापासून 50 किमी अंतरावर वादळाची तीव्रता कमी होण्यास (Nisarga Cyclone Effect On Electricity) सुरुवात झाली.

संबंधित बातम्या :

पुण्यात घराचं छप्पर उडून वृद्धेचा मृत्यू, अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एकाचा बळी

चक्रीवादळ दूर होण्यासाठी पुढील 6 तास महत्वाचे, सर्वत्र पाऊस कोसळत राहणार : हवामान विभाग

बीकेसीमधील कोविड 19 केंद्रालाही चक्रीवादळाचा जोरदार फटका, नितेश राणेंकडून व्हिडीओ पोस्ट करत टीका

चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे : बाळासाहेब थोरात

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.