चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला बंदी

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला हायकोर्टाने परवानगी नाकारली. मात्र चंद्रशेखर आझाद भीमा कोरेगावत अभिवादन करण्यासाठी जाऊ शकतात, असं कोर्टाने नमूद केलं. भीम आर्मीतर्फे उच्च न्ययल्यात याचिका दाखल करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चंद्रशेखर आझाद विद्यार्थ्यांशी चर्चा आज करणार होते. मात्र विद्यापीठाने या कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती. त्याविरोधात भीम आर्मीने …

चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला बंदी

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला हायकोर्टाने परवानगी नाकारली. मात्र चंद्रशेखर आझाद भीमा कोरेगावत अभिवादन करण्यासाठी जाऊ शकतात, असं कोर्टाने नमूद केलं. भीम आर्मीतर्फे उच्च न्ययल्यात याचिका दाखल करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चंद्रशेखर आझाद विद्यार्थ्यांशी चर्चा आज करणार होते. मात्र विद्यापीठाने या कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती. त्याविरोधात भीम आर्मीने हायकोर्टात दाद मागितली होती. सुट्टीकालीन न्यायाधीशांसमोर आजची सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या सभेला परवानगी देण्यास नकार दिला.

भीम आर्मीच्या या प्रकरणात पुढील सुनावणी 4 जानेवारी 2019 रोजी होणार आहे.

दरम्यान, चंद्रशेखर आझाद हे नजरकैदेत नाहीत, तसेच त्यांना ताब्यातही घेण्यात आले नाहीत, असं पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

याबाबतचं शपथपत्र 4 तारखेला कोर्टात सादर केलं जाणार आहे.

मुंबईत नजरकैद

दरम्यान, चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.  पण 27 डिसेंबरपासून ते मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत होते. 28 डिसेेंबरला त्यांची मुंबईतील जांबोरी मैदानात सभा होती, पण ती सभा होऊ शकली नाही. आझाद यांना मालाड इथल्या मनाली हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं.  त्यानंतर काल ते पुण्यात दाखल झाले. तीन दिवसांनी ते नजरकैदेतून बाहेर पडले.

कोण आहेत चंद्रशेखर आझाद?
– चंद्रशेखर आझाद हे नाव उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारानंतर सर्वांसमोर आलं.
– या दंगलीनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली.
– देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे
– सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून काही दिवसांपूर्वीच सुटका झाली.
– देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख बनली.

भीम आर्मी
चंद्रशेखर आझाद यांनी तीन वर्षापूर्वी भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केल्याचं आझाद यांचं म्हणणं आहे.दलित, बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना काम करत असल्याचं आझाद यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

तीन दिवसांनंतर चंद्रशेखर ‘आझाद’ 

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही नजरकैदेत 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *