पाच हजार वर्षांपूर्वीचा स्त्री-पुरुषाचा सांगाडा बाहेर

पुणे : सिंधू संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदडो ही अतिप्राचीन समृद्ध संस्कृती मानली जाते. पाकिस्तानात ही दोन्ही ठिकाणं आहेत. मात्र पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संशोधनात भारतातील अतिप्राचीन शहराचे अवशेष आढळलेत. हरियाणातील राखीगढी हे सिंधू संस्कृतीतील साधारण साडेपाच हजार वर्षांपूर्वीचं  शहर आहे. अतिप्राचीन आणि पायाभूत सुविधांनी समृद्ध शहर आहे. भारतीय उपखंडात इथे प्रथमच एकाच दफन खड्ड्यात स्त्री आणि […]

पाच हजार वर्षांपूर्वीचा स्त्री-पुरुषाचा सांगाडा बाहेर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

पुणे : सिंधू संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदडो ही अतिप्राचीन समृद्ध संस्कृती मानली जाते. पाकिस्तानात ही दोन्ही ठिकाणं आहेत. मात्र पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संशोधनात भारतातील अतिप्राचीन शहराचे अवशेष आढळलेत. हरियाणातील राखीगढी हे सिंधू संस्कृतीतील साधारण साडेपाच हजार वर्षांपूर्वीचं  शहर आहे. अतिप्राचीन आणि पायाभूत सुविधांनी समृद्ध शहर आहे. भारतीय उपखंडात इथे प्रथमच एकाच दफन खड्ड्यात स्त्री आणि पुरुषाचा सांगाडा आढळलाय. सांगाड्यांच्या रचनेवरुन दोघे पती-पत्नी असल्याचं समोर येतंय. त्यामुळे साडेपाच हजार वर्षांपूर्वी विवाहसंस्था अस्तित्वात असल्याची शक्यता आहे.

घरांच्या पक्क्या बांधकामाचे अवशेष… घरातच शौचालय आणि स्नानगृह… बंदिस्त नाल्यातून सांडपाण्याची विल्हेवाट… घरातच धान्याचं कोठार… ही दृश्य पाहिल्यावर एखाद्या आदर्श गावाचं हे चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र हे दृश्य आहे हरियाणातील राखीगढीचं. राखीगढी हे हरियाणातील अतिप्राचीन शहर आहे. सिंधू संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतीतील शहर आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या संशोधनात गौरवशाली इतिहास समोर आलाय.

संशोधकांच्या मते, रचनाबद्ध बांधकाम, सांडपाणी व्यवस्था आढळून आली आहे. जगात असे बांधकाम दिसत नाही. संशोधनात 40 मृतदेहाचं उत्खनन करुन अभ्यास करण्यात आलाय.

सिंधू संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदडो ही अतिप्राचीन संस्कृती मानली जाते. साधारण साडे तीन हजार वर्षांपूर्वीची ही संस्कृती आहे. सध्या पाकिस्तानात ही दोन्ही शहरं आहेत. मात्र पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाला संशोधनात प्राचीन शहराचे अवशेष आढळलेत. भारतातील हरियाणात सिंधू संस्कृतीतलं राखीगढी हे शहर आहे. साधारण साडे पाच हजार वर्षांपूर्वीचं हे शहर आहे.

कशी आहे राखीगढीची रचना?

राखीगढी हे साडे तीनशे हेक्टरवर वसलेलं शहर होतं. शहरापासून सातशे मीटर उत्तरेला दफनभूमी होती. घरांचं बांधकाम पक्क्या विटांचं आहे. तीन विटांच्या जाडीच्या घराच्या भिंती आहेत. घरात अनेक खोल्या आहेत. घरातच धान्य साठवण्याची उत्कृष्ट गोदामं आहेत. घरातच शौचालय आणि स्नानगृह आहेत. बंद नाल्यातून सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. भाजलेल्या पक्क्या विटांपासून बांधकाम केलंय. यावरुन राखीगढीच्या पुरातन समृद्धीची कल्पना येते.

राखीगढीच्या संशोधनात भारताची समृद्ध गौरवशाली परंपरा पाहायला तर मिळत आहे. मात्र या संशोधनात भारताच्या गौरवशाली विवाहसंस्थेचाही सबंध येतोय.  दफन भूमीच्या उत्खननात एका खड्ड्यात स्त्री आणि पुरुषाचा सांगाडा आढळलाय. पुरुष हा स्त्रीकडे प्रेमाने पाहात असल्याचा सांगाडा आहे. सांगाड्यांच्या रचनेवरुन दोघे पती-पत्नी असल्याचं संशोधनात पुढं येतंय. भारतीय उपखंडातील संशोधनात प्रथमच असा दोघांचा सांगाडा आढळलाय. या अवशेषांवर कॉलेजच्या लॅबमध्ये संशोधन केलं जातंय.

राखीगढीच्या संशोधनात दफनभूमीचे नवीन प्रकार समोर आलेत. या संशोधनातून भारताच्या प्राचीन समृद्ध संस्कृतीची नव्याने ओळख झालीय. साडे पाच हजार वर्षांची ही आदर्श संस्कृती पाहायला मिळते. एका खडड्यात फक्त सांगाड्यांचे काही भाग आणि पुरातन वस्तू आढळतात, तर काही खड्ड्यात सांगाडा आणि पुरातन वस्तू आढळतात. तर एका खड्ड्यात प्रथमच स्त्री आणि पुरुषाचा सांगाडा आढळलाय. पुरुषाचा सांगाडा 170 सेंटीमीटर उंचीचा तर स्त्रीचा सांगाडा 160 सेंटीमीटर उंचीचा आहे. एकाचवेळी दोघांना दफन केल्याची शक्यता आहे.

कसा आहे स्त्रीचा सांगाडा?

उंची – पाच ते साडे पाच फूट

वय – 20 ते 25 वर्ष

चेहर्‍याची खोपडी- दिशा अकाशाकडे

शरीरयष्टी – पुरुषाच्या तुलनेत बारीक

अलंकार – गळ्याभोवती कोरीव दगडी अलंकार

सांगाड्यांची वैशिष्ट्य – हनुवटी बारीक,  कंबराचे हाड मोठे

पुरुषाचा सांगाडा  

उंची – साडे पाच ते सहा फूट

वय – 35 ते 40 वर्ष

चेहर्‍याची खोपडी – स्त्रीकडे पाहताना

शरीरयष्टी – स्त्रीच्या तुलनेत उंचपुरी

सांगाड्यांची वैशिष्ट्ये – हनुवटी टणक, बारीक कंबर

राखीगढीच्या संशोधनात दफनभूमीत काही पुरातन भांडी आणि शस्त्र आढळली आहेत. या भांड्यात मृतांसाठी अन्न आणि पाणी ठेवलं जात होतं. पुनर्जन्माच्या श्रद्धेपोटी मृतांना खाण्यासाठी अन्नपदार्थ ठेवल्याची शक्यता आहे. तर काही खड्ड्यात केवळ सांगाड्यांचे अवशेष आढळलेत. मृतावर अंत्यसंस्कार केल्यावर केवळ अवशेष खड्ड्यात गाडण्याची प्रथा इथे दिसते. तर काही खड्ड्यांत केवळ भांडी आढळून आली आहेत. मृतदेह उपलब्ध न झाल्याने भांडी गाठून स्मृती जपण्यात आल्यात.

डेक्कन कॉलेजच्या संशोधनाने राखीगढी आता हजारो वर्षानंतर पुन्हा चर्चेत आलंय. या संशोधनाने राखीगढीला पर्यटनस्थळाचं महत्त्व आलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.