सिलिंडरमधून गॅस गळती, पिंपरी चिंचवडमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, सात चिमुरडे जखमी

स्फोटाची भीषणता इतकी होती की शेजारी कुटुंबातील पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगाही यात जखमी झाले

सिलिंडरमधून गॅस गळती, पिंपरी चिंचवडमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, सात चिमुरडे जखमी

पिंपरी चिंचवड : सिलिंडरमधून गॅस गळती होऊन पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर सात लहान मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत. दिघी परिसरातील राहत्या वसाहतीत झालेल्या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pimpari Chinchwad Cylinder Blast Seven Children injured)

गॅस सिलेंडरमधून रात्रभर वायू गळती झाल्याने हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. ही घटना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दिघी आणि भोसरीच्या हद्दीवर असलेल्या महादेवनगरमधील अष्टविनायक वसाहतीत घडली.

फ्लॅट क्रमांक 102 मध्ये टेमकर यांच्या घरात हा स्फोट झाला. यामध्ये 40 वर्षीय ज्ञानेश्वर टेमकर यांचा मृत्यू झाला. तर टेमकर कुटुंबातील चौघे जण जखमी झाले. तर त्यांचे दोन नातेवाईकही जखमी झाले आहेत.

सिलेंडरमधून शनिवारी रात्रभर गॅस लिकेज होत राहिला, मात्र टेमकर कुटुंबातील व्यक्तीने रविवारी पहाटे गॅस सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गॅसचा स्फोट झाला.

या स्फोटाची भीषणता इतकी होती की तिचे परिणाम शेजारच्या फ्लॅट क्रमांक 103 मध्येही जाणवले. स्फोटाच्या हादऱ्याने घरातील भिंत कोसळल्याची माहिती आहे. शेजारी राहत असलेल्या सुरवाडे कुटुंबातील पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगाही यात जखमी झाले आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये सात लहान मुले यांच्याशिवाय महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pimpari Chinchwad Cylinder Blast Seven Children injured)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *