पिंपरीत गावठी दारू भट्टीवर छापा, 16 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, कार, दुचाकी, मोबाइल आणि अन्य साहित्य असा एकूण 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी परिसरातील मुळा नदीच्या काठावर ही कारवाई करण्यात आली.

पिंपरीत गावठी दारू भट्टीवर छापा, 16 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड : गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, कार, दुचाकी, मोबाइल आणि अन्य साहित्य असा एकूण 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी परिसरातील मुळा नदीच्या काठावर ही कारवाई करण्यात आली. (Pimpri Chinchwad Social Security Squad raided distillery)

मिळालेल्या माहितीनुसार, बाबू राठोड आणि राम क्षीरसागर अशी आरोपींची नावं असून दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना मुळशी तालुक्‍यातील माण इथं मुठा नदीच्या काठावर काही व्यक्ती अवैधरित्या गावठी दारू तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता दारू भट्टीवर छापा मारला.

यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच लाख रुपयांची नऊ हजार लिटर दारू, रसायनं, 70 हजार 500 रुपयांची 1 हजार 175 लिटर तयार दारू, 9 हजारांचे तीन हजार किलो सरपण, 10 लाखांची एक कार, पाच हजारांची थर्मल जाळी आणि एक हजाराचा मोबाइल फोन असा एकूण 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pimpri Chinchwad Social Security Squad raided distillery)

या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी शिवाजीनगर पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना अटक केली होती. (Ichalkaranji Police Seized Gutkha). या कारवाईत पोलिसांनी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. इचलकरंजी इथं शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली होती.

बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारी मोटार शिवाजीनगर पोलिसांनी पकडली होती. या प्रकरणी अमोल अरुण लोळगेला (वय 40) अटक करण्यात आली होती. शेळके मळा ते लिंबू चौक या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत विविध कंपन्यांचा 2 लाख 19 हजार रुपयांचा गुटखा, मोटार आदींसह सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

इतर बातम्या – 

दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, पुण्यातील गर्दीवर अजित पवारांचा खोचक टोला

चिंता वाढली! सुसाईड नोट सोडून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता

(Pimpri Chinchwad Social Security Squad raided distillery)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *