PM Narendra Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोरोना लसीचा आढावा, कसा असेल मोदींचा पुणे दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (28 नोव्हेंबर) पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. (PM Narendra Modi Will Visit Pune Serum Institute of India)

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 15:20 PM, 27 Nov 2020

पुणे : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील जनतेचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मिती केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचा दावा सिरमचे अदर पुनावाला यांनी केला आहे. या लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (28 नोव्हेंबर) पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीचा आढावा घेतील. (PM Narendra Modi Will Visit Pune Serum Institute of India)

कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा?

शनिवार (28 नोव्हेंबर)

 • सकाळी 11.10 वाजता – अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण
 • दुपारी 12.25 वाजता – पुणे विमानतळावर दाखल
 • दुपारी 12.30 वाजता – पुणे विमानतळावरुन MI-17 या हेलिकॉप्टरद्वारे हेलिपॅड असणाऱ्या ठिकाणी उड्डाण
 • दुपारी 12.50 वाजता – पुणे हेलिपॅडजवळ
 • दुपारी 12.55 वाजता – हेलिपॅडजवळून रस्तेमार्गे सिरम इन्स्टिट्यूटसाठी रवाना
 • दुपारी 1 वाजता – सिरम इन्स्टिट्यूटजवळ दाखल
 • दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत – सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीचा आढावा
 • दुपारी 2.30 वाजता – पुन्हा पुणे विमानतळाकडे रवाना
 • दुपारी 3.45 वाजता – पुण्याहून हैद्रराबाद विमानतळाकडे दाखल

सिरम इन्स्टिट्यूट भारतात डिसेंबरपर्यंत 10 कोटी डोस पुरवणार

संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीवर मोठ्या वेगाने काम सुरू आहे. यातच पुण्यातल्या कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात भारताला मोठं यश येईल.

सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या समाधानकारक असल्याची माहितीही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल चांगले आले असून आता लस रुग्णांच्या वापरासाठी तयार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi Will Visit Pune Serum Institute of India)

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर, कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार