सुप्रिया सुळेंच्या बारामतीत मोदींच्या सभेची तारीख ठरली

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी 10 एप्रिलला बारामतीत येणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ते भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतील. बारामतीतून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. मोदींच्या या सभेमुळे बारामतीमधील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष वेधले जात आहे. ही …

सुप्रिया सुळेंच्या बारामतीत मोदींच्या सभेची तारीख ठरली

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी 10 एप्रिलला बारामतीत येणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ते भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतील. बारामतीतून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.

मोदींच्या या सभेमुळे बारामतीमधील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष वेधले जात आहे. ही लढाई एकतर्फी नसून दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न होतील हेच यातून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे 2014 मध्येही मोदींनी बारामतीत जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी मोदींनी पवार काका-पुतण्यावर जोरदार टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी दुसरीकडे बारामती मतदारसंघात गावा-गावांमध्ये जाऊन जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

हवा कोणाचीही आली तरी बारामतीत पवारांचीच हवा

दरम्यान, आजपर्यंत हवा कोणाचीही आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलेला आहे. कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू, असंही म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

सुळे म्हणाल्या होत्या, ‘गेल्या 5 वर्षात भाजपने जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले. हेच पैसे जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं. मात्र स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आले. त्यामुळे आपण या निवडणुकीत कोणतंही सरकार आलं तरी संसदेत आवश्यकतेशिवाय इतर कामांसाठी जाहिरातीच करायच्या नाहीत याबद्दलचं विधेयक मांडणार आहे.’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *