VIDEO : पुण्यात 13 महिला रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकल्या, तीन तासानंतर सुटका

नोबेल रुग्णालयातील तब्बल तीन तास लिफ्टमध्ये अडकलेल्या रुग्णालयातील 13 महिलांची सुटका करण्यात यश आलं (Pune Lift stuck) आहे.

Pune Lift stuck, VIDEO : पुण्यात 13 महिला रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकल्या, तीन तासानंतर सुटका

पुणे : तब्बल तीन तास लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 महिलांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आलं (Pune Lift stuck) आहे. नोबेल रुग्णालयात चौथ्या मजल्यावरुन पहिल्या मजल्यावर येत असताना ही घटना घडली आहे. या महिला कर्मचाऱ्यांची 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर महिला (Pune Lift stuck) कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मगरपट्ट्यातील नोबेल रुग्णालयात आयनॉक्स शाखेत महिला कर्मचारी लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी लिफ्टमध्ये घुसल्याने हा गोंधळ झाला. लिफ्टची क्षमता 7 माणसांची असताना तब्बल 13 कर्मचारी लिफ्टमध्ये घुसले. त्यामुळे रोपचा बेल्ट घसरला आणि लिफ्ट बंद पडली. यामुळे तेरा महिला कर्मचारी लिफ्टमध्ये अडकून (Pune Lift stuck) पडले.

लिफ्टचा दरवाजा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरला. त्यामुले अनेकजण जीव मुठीत धरुनच सर्वजण मदतीची याचना करत होते. यानंतर अखेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर 13 महिलांची सुटका करण्यात (Pune Lift stuck) आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *