पुण्यात नवदाम्पत्यासह 35 वऱ्हाड्यांना कोरोना, सात गावं सील

पुण्यातील जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला कोरोनाची लागण झाली (Pune 35 people Corona infection in wedding)  आहे.

पुण्यात नवदाम्पत्यासह 35 वऱ्हाड्यांना कोरोना, सात गावं सील

पुणे : पुण्यातील एका विवाह सोहळ्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली (Pune 35 people Corona infection in wedding) आहे. पुण्यातील एका विवाह सोहळ्यात नवदाम्पत्यासह तब्बल 35 वऱ्हाड्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल सात गावं सील करण्यात आली आहे.

पुण्यातील जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय या विवाह सोहळ्यातील 35 वऱ्हाडींना कोरोना झाला आहे. त्यामुळे जुन्नरमधील सात गाव सील करण्यात आली आहे. यामुळे जवळपास सात गावातील हजारो ग्रामस्थांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

विशेष म्हणजे लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नातेवाईकांना परवानगी नसतानाही हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात 50 वऱ्हाड्यांच्या नियमांची पायमल्ली केली. विशेष म्हणजे रात्री डिजेच्या तालावर वरातही निघाली.

यात नववधू-वर, आई-वडिल, पाहुणे, मित्र मंडळी असे जवळपास 35 पेक्षा अधिक नातेवाईक उपस्थित होते. त्या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या इतरांची तपासणी अद्याप झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर डीजे चालकावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pune 35 people Corona infection in wedding) आहे.

संबंधित बातम्या : 

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लग्नात हजेरी, बीड ते हैदराबाद प्रवास, 49 जणांवर गुन्हा दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *