पुण्यात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, किराणा, भाजीपाला, चिकन-मटण दुकानं बंद

पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 24 वाजेपर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत.

पुण्यात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, किराणा, भाजीपाला, चिकन-मटण दुकानं बंद
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 5:03 PM

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा उद्रेक (Pune Additional Restrictions) वाढत आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे (Corona Virus) 1 हजार 120 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 82 जणांना आपाल जीव गमवावा लागला आहे. सर्वतोपरी प्रयत्न करुनही पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचे कोटकोरपणे पालन व्हावे यासाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध (Pune Additional Restrictions) लावण्यात आले आहेत.

पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 24 वाजेपर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत. सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळं, चिकन, मटण, अंडी यांची विक्री, दुकानं वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र दिवसभरात केवळ दोन तास सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील. तर घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वेळेच बंधन असेल. मात्र दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत (Pune Additional Restrictions).

पुण्यातील ‘या’ भागात अतिरिक्त निर्बंध

परिमंडळ 1

1) समर्थ पोलीस स्टेशन 2) खडक पोलीस स्टेशन 3)फरासखाना पोलीस स्टेशन

परिमंडळ 2 

1)स्वारगेट पोलीस स्टेशन

  • गुलटेकडी,
  • महर्षीनगर झोपडपट्टी परिसर,
  • डायस प्लॉट,
  • इंदिरानगर,
  • खड्डा झोपडपट्टी

2)लष्कर पोलीस स्टेशन

  • नवीन मोदीखाना
  • पूना कॉलेज रोड,
  • मोदीखाना कुरेशी मस्जिद,
  • भीमपुरा लेन,
  • बाबाजान दर्गा,
  • शिवाजी मार्केट
  • शितलादेवी मंदिर,

3)बंडगार्डन पोलीस स्टेशन

  • ताडीवाला रस्ता

4) सहकार नगर पोलीस स्टेशन

  • तळजाई वसाहत
  • बालाजीनगर

परिमंडळ 3

1) दत्तवाडी पोलीस स्टेशन

2) पर्वती दर्शन परिसर,

परिमंडळ 4

1) येरवडा पोलीस स्टेशन

  • लक्ष्मी नगर
  • गाडीतळ
  • चित्रा चौक परिसर

2) खडकी पोलीस स्टेशन

  • पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर
  • इराणी वस्ती पाटकर प्लॉट

पुण्यात अतिरिक्त निर्बंध लागू होण्याची ही दुसरी वेळ

पुण्यात यापूर्वीही दोन दिवसांसाठी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. पुण्यात 22 ते 23 एप्रिलदरम्यान अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे निर्बंध लागू करण्यात आले होते.

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारच्या पार 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार पोहोचला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुण्यासह, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा अक्षरशः हाहा:कार माजला आहे. आज (30 एप्रिल) दिवसभरात कोरोनाचे 126 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 043 वर पोहोचला आहे.

Pune Additional Restrictions

संबंधित बातम्या :

पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन

पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालय, पोलीस आयुक्तांचा निर्णय

आधी चार महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय, आता पुण्यात पन्नाशीवरील 7 ज्येष्ठांनी कोरोनाला हरवलं

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.