खाकीतली सौंदर्यवती... पुण्यातील API प्रेमा पाटील 'मिसेस इंडिया' बनल्या

जिथे आरोग्याचा प्रश्न भेडसावतो तिथे सौंदर्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र पुण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावलाय. रिनिंग मिसेस इंडिया 2019 किताब त्यांनी पटकावला. पोलीस कँपबरोबरच त्यांच्या शिरपेचात क्राऊनचा मानाचा तुरा रोवलाय.

खाकीतली सौंदर्यवती... पुण्यातील API प्रेमा पाटील 'मिसेस इंडिया' बनल्या

पुणे : पोलीस म्हटलं की आपल्या नजरेसमोर ऊन, वारा, पावसात सदैव सुरक्षेसाठी तैनात असलेला तो चेहरा येतो. कामाच्या पद्धतीने अनेक वेळा त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जिथे आरोग्याचा प्रश्न भेडसावतो तिथे सौंदर्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र पुण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावलाय. रनिंग मिसेस इंडिया 2019 किताब त्यांनी पटकावला. पोलीस कँपबरोबरच त्यांच्या शिरपेचात क्राऊनचा मानाचा तुरा रोवलाय.

रॅम्प वॉक… लाईटचा झगमगाट… प्रेक्षकांचे चिअर अप… आणि कॅमेऱ्यांचे फ्लॅश असं दृष्य रिनिंग मिसेस इंडियाच्या स्पर्धेत होतं. देशभरातील महिलांना मागे सारत प्रेमा पाटील यांनी मानाचा किताब पटकावला. प्रेमा पाटील या विशेष शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात. फेसबुकच्या माध्यमातून त्यांना सौंदर्य स्पर्धेची माहिती मिळाली आणि त्यांनी तयारी सुरू केली. प्रेमा पाटील यांना मैदानावर पोलीस परेडची सवय होती. मात्र रॅम्पवर चालण्याचा त्यांना काही अनुभव नव्हता. पण थांबतील त्या प्रेमा पाटील कसल्या.  त्यांना समस्या भेडसावत होती ती म्हणजे हाय हिल्सच्या चपलांची. मात्र घरी आल्यानंतर त्यांनी रात्री हाय हिल्सच्या चपला घालून सराव केला. त्याचबरोबर नृत्य नृत्य आणि आपल्या बुद्धीच्या बळावर त्यांनी यश मिळवलं.

प्रेमा पाटील यांनी रनिंग मिसेस इंडिया 2019 चा मुकुट पटकावून पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. ही स्पर्धा बारणेर येथील ऑर्किट हॉटेलमध्ये पार पडली. या स्पर्धेचं आयोजन मोनिका शेख यांनी केलं होतं.

प्रेमा पाटील या मूळच्या कराडच्या असून त्यांचं शिक्षण एम.कॉम पर्यंत झालं आहे. गेल्या 9 वर्षांपासून प्रेमा पाटील या पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. सध्या त्या पुणे पोलीस दलातील विशेष शाखेत कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यासोबत समाज कार्याची आवड असल्याने प्रेमा पाटील या कार्बोनरी या सामाजिक संस्थेसोबत गरीब आणि गरजू मुलांना मदत करत असतात. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांनाही त्या शिकवतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *