समुद्र स्वच्छतेसाठी जहाज निर्मिती, पुण्यातील 12 वर्षीय वैज्ञानिकाची कमाल

समुद्र स्वच्छतेसाठी जहाज निर्मिती, पुण्यातील 12 वर्षीय वैज्ञानिकाची कमाल

पुणे : जगभरात ज्या प्रश्नाने वैज्ञानिक हैराण झाले आहेत, अशा समुद्रातील प्रदूषणाच्या विषयावर पुण्यातील 12 वर्षीय छोट्या वैज्ञानिकाने मात्र उत्तर शोधले आहे. हाझिक काझी असे या लहानग्याचे नाव असून समुद्रातील प्लास्टिक आणि इतर कचरा काढण्यासाठी त्याने भन्नाट जहाजाची निर्मिती केली आहे. आपल्या या जहाजाचे नाव त्याने ‘ERVIS’ असे ठेवले आहे.

हाझिक काझी हा 12 वर्षीय पुण्यातील भुगाव भागात इयत्ता 7 वीत शिकतो आहे. मात्र या मुलाने एक भन्नाट डिझाईन तयार केलंय. ज्याचे आज जगभरात कौतुक होत आहे. शिवाय अनेक पर्यावरण अभ्यासकांकडून त्याला पसंती मिळत आहे. काही डॉक्युमेन्ट्री पाहून हाझिकला समुद्राच्या प्रदूषणाबाबत चिंता वाटू लागली. त्यानंतर प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात केली.

आपण समुद्रातील जे मासे खातो, ते मासे सध्या प्लास्टिक आणि इतर कचरा खाऊन जगत आहेत. म्हणजेच प्रदूषण हे एका चक्राप्रमाणे आहे, फिरुन ते पुन्हा आपल्यापर्यंतच येते. मात्र ERVIS या जहाजाद्वारे समुद्रातील कचरा वेगळा केला जाऊ शकतो. मात्र यासाठी काही संस्था किंवा सरकारने पुढे येण्याची गरज आहे.

या जहाजातील तंत्रज्ञानावारे पाणी, समुद्रातील जीव आणि कचरा असे तीन वेगळे गट केले जातील. त्यानंतर पाणी आणि समुद्रातील जीव पुन्हा समुद्रात सोडण्यात येतील. मग कचऱ्याचे पाच भाग करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल. आपली ही कल्पना हाझिकने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या टेडएक्स आणि टेडड यामध्ये मांडले आणि त्यामुळे त्याच्या या संशोधनाचे जगभरात कौतुक होताना दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *