ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी तातडीने नियुक्ती करा, पुणे भाजप शहराध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवार 16 एप्रिल रोजी राज्य शासनाने बदली केली होती. (Pune BJP demands appointment of sassoon hospital dean)

ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी तातडीने नियुक्ती करा, पुणे भाजप शहराध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
sassoon hospital, pune
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 4:06 PM

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदासाठी अनुभवी, सक्षम आणि पूर्ण वेळ अधिकार्‍याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. डॉ. अजय चंदनवाले यांची दोन आठवड्यांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मुळीक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नव्या अधिष्ठात्याच्या नियुक्तीची मागणी केली आहे. (Pune BJP demands appointment of sassoon hospital dean)

सर्वसामान्य रुग्ण हे उपचारांसाठी ससून रुग्णालयावर अवलंबून असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ससून रुग्णालयावरील ताण वाढलेला आहे. ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सक्षम अधिकार्‍याची तातडीने गरज असल्याचे मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर ससूनमधील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांचे मनोधैर्य खचल्याचा दावाही मुळीक यांनी केला आहे. ‘या सर्वांनी याविषयीच्या भावना कृतीतून आणि पत्र लिहून सरकारकडे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा’ असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.

हेही वाचा : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संताप

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवार 16 एप्रिल रोजी राज्य शासनाने बदली केली होती. सध्या त्यांचा पदभार रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. डॉ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला मार्डने विरोध केला होता.

ससून रुग्णालयात एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात 38 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचाच ठपका ठेवून डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे मार्डचे डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी ससून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात जमत बदली चुकीची असल्याचा आरोप केला होता. इमर्जन्सी असून रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशा कठीण काळात तडकाफडकी बदली योग्य आहे का असा सवाल त्यांनी केला होता. (Pune BJP demands appointment of sassoon hospital dean)

ससूनमध्ये 11 मजली इमारत कोविड 19 हॉस्पिटल

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील विशेष कोविड 19 हॉस्पिटल 12 एप्रिलपासून कार्यरत झालं आहे. नवीन अकरा मजली इमारत विशेष कोविड 19 हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. केवळ पंधरा दिवसात हॉस्पिटलमधील सर्व पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात आल्या.

या इमारतीच्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. इथं 50 बेडचा आयसीयू, 100 बेड आयसोलेशन, 13 हजार लिटर ऑक्सिजन पाईपलाईन आणि 300 टनाच्या एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर निष्णात डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारीही कार्यरत आहेत. एकाच इमारतीत सर्व रुग्णांना सर्व सुविधायुक्त उपचार देण्यासाठी या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.

(Pune BJP demands appointment of sassoon hospital dean)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.