पुण्यात पोलिसांनी अडवलेला दुचाकीस्वार म्हणाला मी ATS मध्ये कामाला, चौकशीनंतर निघाला भलताच

पुणे शहरात वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर दंडाची कारवाई केली.

Pune fake police arrested by traffic police, पुण्यात पोलिसांनी अडवलेला दुचाकीस्वार म्हणाला मी ATS मध्ये कामाला, चौकशीनंतर निघाला भलताच

पुणे : पुणे शहरात वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर दंडाची कारवाई केली. त्यानंतर या पठ्ठ्याने आपण एटीएस विभागात काम करत असल्याच सांगितलं. चक्क पोलिसांना पोलीस असल्याचं सांगून गंडा घालणाऱ्या या आरोपीचा पर्दाफाश झाला.

विवेक रामराव खतोडे असं तोतया पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. तो पुण्यातील सिंहगड रोडचा रहिवासी असून, त्याच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून त्याने दाखवलेले बनावट ओळखपत्र जमा करत स्वारगेट पोलीस स्टेशनला कळवलं. स्वारगेट पोलीस स्टेशनने मुंबईत एटीएसमध्ये याची चौकशी केली असता, विवेक खतोडे नावाचा कोणीही अधिकारी नसल्याच समोर आलं. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अखेर त्याला स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हवाली केलं. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *