पुण्यात तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण, काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे: तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात आवळल्या. इतकंच नाही तर मुलीचीही सुखरुप सुटका केली. कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास  पुण्यातील कोंढावा परीसरातील  टिळेकरनगर इथून, आरोपीला ताब्यात घेतलं. उमेश सासवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सिमेंट व्यावसायिकाची तीन वर्षांची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी उमेश सासवेने …

pune girl kidnapped and rescued in few hours accused arrested, पुण्यात तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण, काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे: तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात आवळल्या. इतकंच नाही तर मुलीचीही सुखरुप सुटका केली. कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास  पुण्यातील कोंढावा परीसरातील  टिळेकरनगर इथून, आरोपीला ताब्यात घेतलं. उमेश सासवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

सिमेंट व्यावसायिकाची तीन वर्षांची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी उमेश सासवेने तिचे अपहरण केलं होतं.  त्यानंतर आरोपीने स्वत: राहात असलेल्या टिळेकरनगर इथल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर डांबून ठेवलं होतं.

कोंढवा पोलीस आणि पुणे शहर गुन्हे युनीट 5 च्या पथकाने काही तासात, या गुन्ह्याचा छडा लावून, चिमुकलीची सुटका केली.

आरोपी उमेश हा दारु प्यायला होता. त्याच नशेत त्याने मुलीचं अपहरण केलं. अपहरण करुन रस्त्यावरुन जात असताना, नागरिकांनी त्याला हटकलं. मात्र त्यावेळी त्याने ही मुलगी आपलीच असल्याचं सांगितलं. मात्र पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळून, चिमुकलीची सुखरुप सुटका केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *