पुण्यात पोलीस पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला, आत्महत्या की हत्या?

पुणे: पुण्यात मायलेकरांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आई आणि दोन वर्षाच्या मृत्यू हा आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जान्हवी कांबळे आणि शिवन्स कांबळे असं मृत्यू झालेल्या मायलेकाचं नाव आहे. जान्हवी यांचा नवरा आणि सासरा दोघेही पोलीस दलात आहेत.  घरगुती भांडणातून हडपसरमधील जान्हवी कांबळे यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ही …

, पुण्यात पोलीस पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला, आत्महत्या की हत्या?

पुणे: पुण्यात मायलेकरांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आई आणि दोन वर्षाच्या मृत्यू हा आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जान्हवी कांबळे आणि शिवन्स कांबळे असं मृत्यू झालेल्या मायलेकाचं नाव आहे. जान्हवी यांचा नवरा आणि सासरा दोघेही पोलीस दलात आहेत.  घरगुती भांडणातून हडपसरमधील जान्हवी कांबळे यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याचा तपास आता पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

जान्हवी कांबळे या पुण्यातील हडपसर परिसरात राहत होत्या. त्यांना दोन वर्षाचा शिवन्स हा मुलगा होता. मात्र या दोघांचेही मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घरगुती भांडणातून जान्हवी यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मात्र माहेरच्या लोकांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे जान्हवी यांचे पती आणि सासरे दोघेही पोलीस दलात आहेत.

जान्हवी यांनी घरगुती भांडणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं की त्यांचा घातपात झाला, हे शोधणं आता पोलिसांचं काम आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *