थकवा जाणवतो का? जुलाब होतात का? पुण्यात 8 प्रश्न विचारुन सल्ला देणारा रोबो

या रोबोकडे 8 प्रश्नावली असून उत्तर नोंद केलं जातं. या सर्व प्रश्नांची उत्तरं पॉझिटिव्ह आल्यास स्वॅब तपासणीचा सल्ला दिला जातो.(Pune robot for corona patient)

थकवा जाणवतो का? जुलाब होतात का? पुण्यात 8 प्रश्न विचारुन सल्ला देणारा रोबो
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 6:38 PM

पुणे : पुण्यासह राज्यात आणि देशात सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. (Pune robot for corona patient) एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीलाही त्याची बाधा होत आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रादुर्भाव झालाय. मात्र आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीला अत्याधुनिक रोबोट आला आहे. पेशंटचं स्क्रीनिंग करणारा हा रोबोट आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या आयटीआय विभागानं तो विकसित केला आहे.

या रोबोटच्या माध्यमातून रुग्णाच्या आरोग्यासंदर्भात प्राथमिक माहिती घेतली जाते. या रोबोटसमोर उभा राहिल्यानंतर शरीराचं तापमान नोंदवून तो जाहीर करतो. मग आपल्याला काही प्रश्न विचारुन माहिती जमा करतो. इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रश्न विचारतो. (Pune robot for corona patient)

कोरोना संदर्भात माहिती प्राप्त झाल्यावर तो संबंधित व्यक्तीला सल्ला देतो. आवश्यकता असल्यास स्वॅब तपासणीचा सल्ला देतो. या रोबोटमुळे संशयित व्यक्तीच्या संपर्कात कोणताही आरोग्य कर्मचारी येणार नाही. त्यामुळे संपर्कातून होणारा कोरोना रोखण्यास नक्कीच मदत होणार आहे.

यापूर्वीही कोरोना बाधित रुग्णांचा सेवेसाठी रोबोट तयार करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात हा रोबोट रुग्णांना एका बटनाच्या क्लिकवर कोरोना पेशंटच्या बेडपर्यंत जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि औषधे घेऊन जातो.

या रोबोकडे 8 प्रश्नावली असून उत्तर नोंद केलं जातं. या सर्व प्रश्नांची उत्तरं पॉझिटिव्ह आल्यास स्वॅब तपासणीचा सल्ला दिला जातो.

1) तुम्हाला थकवा जाणवतो का?

2)तुम्हाला जुलाब होतात का?

3) तुम्हाला उलट्या होतात का?

4) वारंवार डोकेदुखीचा त्रास आहे का?

5)श्वसनाचा त्रास जाणवतो का?

6) कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे का?

7)एखाद्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याचं तुम्हाला आठवतं का?

8) थंडी, ताप आणि आणि घशाला त्रास जाणवतो का?

असा त्रास होत असेल तर तुमच्या स्वॅबची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

(Pune robot for corona patient)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.