पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी उपोषणाची वेळ

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील महा मेट्रो स्टेशनच्या कामासाठी एसीसी अल्फ्रा या ठेकेदार कंपनीला काम देण्यात आलंय. या कंपनीने कामगारांचे पगार न देता अचानक कामगार कामावरून काढले. त्यामुळे महा मेट्रोच्या अनेक रेल्वे स्टेशनची कामं ठप्प झाली आहे.

पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी उपोषणाची वेळ
Follow us
| Updated on: Jun 04, 2019 | 10:31 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या पुणे मेट्रोचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी आवश्यक निधीही पुरवण्यात येतोय. मात्र महामेट्रोने खाजगी ठेकेदारांनाही काही प्रमाणात काम दिलंय. हे खाजगी कंत्राटदार कामगारांचा पगार वेळेवर देत नसल्याचं वास्तव समोर आलंय. युद्धपातळीवर काम पूर्ण करत असलेल्या कामगारांना हक्काच्या पगारासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे.

ठेकेदारांनी कामगारांचं वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ठेकेदार कंपनीने सर्व कामगारांची फसवणूक केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील महा मेट्रो स्टेशनच्या कामासाठी एसीसी अल्फ्रा या ठेकेदार कंपनीला काम देण्यात आलंय. या कंपनीने कामगारांचे पगार न देता अचानक कामगार कामावरून काढले. त्यामुळे महा मेट्रोच्या अनेक रेल्वे स्टेशनची कामं ठप्प झाली आहे.

या सर्व प्रकारामुळे एचसीसी अल्फा प्रोजेक्टच्या वल्लभ नगर येथील कार्यालयासमोर आपल्या हक्काच्या पगारासाठी उपोषण सुरू करण्यात आलंय. हे उपोषण गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. ठेकेदार कंपनीने 75 कामगारांना सहा महिन्यांपासून पगार न देता केवळ एक ते दोन महिन्याचा पगार घेऊन या कामगारांना कामावर हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. थकीत रक्कम देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण 15 दिवस उलटूनही कामगारांच्या पगाराची थकीत रक्कम न दिल्यामुळे येथील कामगारांनी पुन्हा उपोषण सुरू करत संबंधित ठेकेदार आणि मेट्रोचे अधिकारी यांच्यावर आर्थिक अफरातफर, विश्वासघात, फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मेट्रोकडून हे काम खाजगी कंपनीला देण्यात आलंय. काम गेल्या दोन वर्षांपासून सुरळीत सुरु होतं. पण जागतिक मंदीमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तरीही कामगारांना 5 महिन्यांचा पगार देण्यात आलाय. फक्त एक महिन्याचा पगार थकीत आहे. हा पगार येत्या 10 दिवसात देऊ, असं एचसीसी कंपनीकडून सांगण्यात आलंय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.