वाहतूक कोंडीवर तोडगा, पुण्यात Y आकाराचा उड्डाणपूल बांधणार!

पुणे : सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि त्यामुळे सगळीकडे फक्त घोषणाच घोषणा ऐकायला मिळत आहेत. पुणेकरांसाठीही महापालिकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने यावेळी महापालिका बजेटमध्ये वाय आकाराचा उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र गेले अनेक वर्षांपासून फक्त आश्वासने मिळत असल्याने यावेळी तरी उड्डाणपूल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत […]

वाहतूक कोंडीवर तोडगा, पुण्यात Y आकाराचा उड्डाणपूल बांधणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पुणे : सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि त्यामुळे सगळीकडे फक्त घोषणाच घोषणा ऐकायला मिळत आहेत. पुणेकरांसाठीही महापालिकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने यावेळी महापालिका बजेटमध्ये वाय आकाराचा उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र गेले अनेक वर्षांपासून फक्त आश्वासने मिळत असल्याने यावेळी तरी उड्डाणपूल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. धायरी फाट्यापासून नांदेड सिटीपर्यंतचा हा उड्डाणपूल इंग्रजी वाय आकारात करण्यात येणार आहे. यामधील एक रस्ता नांदेड सिटीकडे, तर दुसरा रस्ता धायरी गावांमध्ये नेण्याची योजना आहे. हा उड्डाणपूल झाला तर सिंहगड रस्त्यावरील काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडून काही उपाय योजना सांगण्यात येत होत्या. मात्र यावर काहीही करण्यात येत नाही. नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष यांनी केलाय.

गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यातील काही निधी प्रभागातील अन्य कामांसाठी वळवण्यात आला. सिंहगड रस्त्यावरून शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्याची मोठी गर्दी असते.

सिंहगड रस्त्यावर खडकवासल्यापर्यंत मेट्रो करण्यात यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांची आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक बजेटमध्ये सिंहगड रस्ता कोंडी सोडवण्यासाठी पैसे ठेवले जातात. मात्र होत काहीच नाही. त्यामुळे फक्त सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केला जाणारा पूल होईल तेव्हा खरे. कारण या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्यावर पूल होणं आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात या नवीन पुलाचे काम सुरू होऊन काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटेल असा विश्वास नगरसेवक व्यक्त करतात.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.