पुण्यात मध्यरात्री पाईपलाईन फुटून घरात पाणी शिरलं, नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पद्मावतीला जाणारी पाण्याची पाईपलाईन मध्यरात्री फुटल्याने, लाखो लिटर पाणी वाया गेलं. मात्र पाईपलाईन फुटल्याने जनता वसाहतमध्ये सध्या भीतीदायक वातावरण आहे. पाईपलाईन फुटल्याने जनता वसाहतीत अनेक घरात पाणी घुसल्याने, घरांच्या भिंती पडल्या. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र …

पुण्यात मध्यरात्री पाईपलाईन फुटून घरात पाणी शिरलं, नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पद्मावतीला जाणारी पाण्याची पाईपलाईन मध्यरात्री फुटल्याने, लाखो लिटर पाणी वाया गेलं. मात्र पाईपलाईन फुटल्याने जनता वसाहतमध्ये सध्या भीतीदायक वातावरण आहे. पाईपलाईन फुटल्याने जनता वसाहतीत अनेक घरात पाणी घुसल्याने, घरांच्या भिंती पडल्या. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. सर्वजण झोपेत असताना अचानक घरात पाणी आल्याने नेमकं काय घडलंय हेच अनेकांना कळत नव्हतं.  काही महिन्यांपूर्वी याच भागात कालवा फुटल्याने घरांचं मोठं नुकसान झालं होतं.

शहरात यंदा भीषण पाणी टंचाई असताना जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं. जलवाहिनी फुटल्यान सहा ते आठ घराचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. झोपेत असताना नागरिकांच्या जीववर हा प्रसंग बेतल होता. झोपेत असताना अचानक पाणी आल्यानं नागरिकांनी जीव मुठीत धरुन पळ काढला. त्यामुळे जीवितहानी टाळली. यामुळे साधारण अकरा नागरिकांचा जीव वाचला म्हणावं लागेल. कसेबसे घराबाहेर पडताना तिघांना दुखापत झाली. पाणी आल्यामुळे अनेकांना घराची दारं उघडणेही अवघड झालं होतं.

जनता वसाहतीत विठ्ठल मंदिर इथे पद्मवतीकडे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून जाणारी पाईप गुरुवारी मध्यरात्री फुटली. या पाईपलाईनमधून पाणी रस्त्यावरुन थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरलं. त्यामुळे घरांचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

दरम्यान ही पाणी पुरवठा विभागाची पाईप लाईन असल्याचं सांगण्यात येत आहे. पाईपलाईन फुटल्याने 10 घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यापूर्वीची दुर्घटना

दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये पर्वतीजवळचा मुठा कालव्याची भिंत कोसळून पुण्यात हाहाकार उडाला होता. भर उन्हात पुण्याच्या रस्त्यावर पुराचं चित्र दिसत होतं. त्यावेळीही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. मुठा कालव्याची भिंत फुटलेल्या ठिकाणी खड्डा होता, त्या खड्ड्यात लाकडाचा ओंडका टाकून खड्डा बुजवण्यात आला होता, त्यामुळेच त्यावेळी दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा पाईपलाईन फुटून घरांमध्ये पाणी शिरल्याने आजूबाजूच्या वस्तीत भीतीचं वातावरण आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *