पुणे हेल्मेटसक्ती : आठवडाभरात दोन कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. गेल्या 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. या अंतर्गत पुणे पोलिसांनी कडक कारवाई केली. गेल्या आठवड्याभरात या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई करत तब्बल 2 कोटी 28 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 1 जानेवारीपासून […]

पुणे हेल्मेटसक्ती : आठवडाभरात दोन कोटींपेक्षा अधिक दंड वसूल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. गेल्या 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. या अंतर्गत पुणे पोलिसांनी कडक कारवाई केली. गेल्या आठवड्याभरात या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई करत तब्बल 2 कोटी 28 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. मात्र पुणेकरांनी या आदेशाचा विरोध केला. तर पुणेकरांचा विरोध न जुमानता या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्याभरात एकूण 45 हजार 682 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड घेण्यात आला. त्यामुळे पुणे वाहतूक शाखेने आठवडाभरात पुणेकरांकडून 2 कोटी 28 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

हेल्मेटसेक्ती लागू झाल्यापासून पुण्यात दररोज साधारण सात हजार लोकांवर कारवाई करण्यात आली. सुरुवातीला पुणेकरांनी या हेल्मेटसक्तीला विरोध केला. मात्र वाहतूक शाखेच्या धास्तीने आता नागरिकांनीही हेल्मेट वापरण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. सध्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त पुणेकर हेल्मेट वापरत असल्याचं वाहतूक शाखेने सांगितलं. शहरातील बावीस विभागांत ही कारवाई करण्यात आली. यासाठी 600 कर्मचारी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर नजर ठेवून आहेत. यादरम्यान चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यापूर्वीही पुण्यात अनेकदा हेल्मेटसक्तीचे प्रयत्न झाले. मात्र पुणेकरांनी ते हाणून पाडले. पण यावेळी खुद्द पोलीस आयुक्तांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देत, हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला. हा निर्णय पुणेकरांनाही स्वीकारावा लागला. पुण्यात आधीच ट्रॅफिकची मोठी संख्या आहे. पुण्यात जितकी लोकसंख्या आहे, तितकीच वाहनांचीही संख्या आहे. त्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. त्यातच अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने, हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रस्ते अपघातात डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा अपघात किरकोळ असतो, मात्र डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वारांचा जीव जातो. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

देशातील अनेक शहरांत हेल्मेटसक्ती आहे. मात्र पुण्यामध्ये हेल्मेट वापरण्यास विरोध केला जातो. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई केली, तर याविरोधात आंदोलने केली जातात. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्ती हा कायमच वादाचा विषय राहिलेला आहे. पुण्यात सुमारे 27 लाख दुचाकी आहेत. त्यातून हेल्मेट वापरण्याची संख्या तुरळक प्रमाणात आहे.

तर हेल्मेटसक्ती लागू झाल्यानंतर, ‘एक वेळ शीख धर्म स्वीकारु पण हेल्मेट घालणार नाही’, मरण जरी आलं तरीही हेल्मेट वापरणार नाही अशी हट्टी भूमिका पुणेकरांनी घेतली होती. त्यातच पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही हेल्मेट सक्तीला विरोध केला होता.

पुणेकरांच्या विरोधानंतरही प्रसाशन मात्र आपल्या निर्णयावर ठाम होतं. त्यामुळे पुणेकर आता हळूहळू का होईना हेल्मेटला स्वीकारत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.