मुलाचा गळफास घेण्याचा प्रयत्न, आई पोलीस स्टेशनकडे धावली, पोलिसांनी दरवाजा तोडून वाचवलं!

 पोलिसांच्या बाबतीत नेहमी नकारात्मक बोललं जातं. मात्र हेच पोलीस पुण्यात आत्महत्या करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणासाठी  देवदूत ठरलेत.

मुलाचा गळफास घेण्याचा प्रयत्न, आई पोलीस स्टेशनकडे धावली, पोलिसांनी दरवाजा तोडून वाचवलं!

पुणे :  पोलिसांच्या (Pune Police) बाबतीत नेहमी नकारात्मक बोललं जातं. मात्र हेच पोलीस पुण्यात आत्महत्या करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणासाठी  देवदूत ठरलेत. पुण्यातील कर्वेनगर परिसरात सोमवारी रात्री एक तरुण गळफास लावून आत्महत्या करत होता. त्याचवेळी त्याच्या आईने हा सर्व प्रकार बघितल्यावर थेट पोलीस स्टेशन गाठले.

रात्रपाळीच्या ड्युटीवर असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर पाठक, प्रतिक मोरे, देवाशीष धोंगडे, आणि महेश बोयने या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवलं.  पोलीस पोहोचण्यास थोडा जरी उशीर झाला असता, तर कदाचित हा तरुण वाचला नसता.

ज्यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडला, त्यावेळी या तरुणाने ओढणीने गळफास लावून घेतला होता. मात्र पोलिसांनी त्याला आधी उचलून गळ्यावरचा ताण कमी केला, त्यानंतर गळ्याभोवतीची ओढणी सोडून त्याला खाली उतरवलं. मग त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे सर्व पोलीस कर्मचारी वारजे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. आपला मुलगा वाचला म्हणून आईने या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या पोलिसांचे सर्वच स्तरातून सध्या कौतुक होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी पुणे पोलीस नेहमीच तत्पर असल्याची भावना यावेळी या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *