पुण्यात CAA-NCR विरोधातील सभेला पोलिसांची नोटीस

कुमार सप्तर्षींनी आयोजित केलेल्या पुण्यातील सभेत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सहभागी होणार होत्या.

पुण्यात CAA-NCR विरोधातील सभेला पोलिसांची नोटीस

पुणे : पुण्यातील गांधीभवनात सीएए आणि एनआरसी विरोधात आयोजित सभेला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षींनी आयोजित केलेल्या या सभेत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सहभागी होणार होत्या. (Pune Program Against CAA NCR)

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज संध्याकाळी सहा वाजता कोथरुडमधील गांधी भवनात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात ‘सीएए’ आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात ‘एनआरसी’ विरोधात कुमार सप्तर्षी यांनी व्याख्यात्यांना निमंत्रित केलं होतं. मात्र कोथरुड पोलिसांनी आयोजक सप्तर्षी यांना नोटीस बजावली आहे.

पत्रकात काय लिहिलं होतं?

30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. सद्यस्थितीत त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, हा या सभेचा हेतू आहे. नागरिक नोंदणी रजिस्टर (एनआरसी), सीएए, एनपीआरवरुन निर्माण झालेली देशातील अस्थिर परिस्थिती सामान्य होण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांचा आश्रय घेणे हा एकमेव मार्ग आहे. या विचारातून आपण समस्तांनी गांधींजींचे स्मरण करणे आवश्यक आहे, म्हणून गांधी विचार प्रेमी समस्त नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे, असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या पत्रकात म्हटलं होतं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या काँग्रेसच्या तिकीटावर मुंबईतून निवडणुकांच्या रिंगणातही उतरल्या, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. उर्मिला यांनी ‘मैंने गांधी को नहीं मारा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. महात्मा गांधींच्या विचारांचा अभ्यास असल्याचं त्या नेहमी सांगतात. त्यामुळेच व्याख्यात्यांमध्ये उर्मिला मातोंडकर यांचाही समावेश होता.

इतर कार्यक्रम काय?

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे गांधीभवनात प्रार्थना होते. दुपारी साडेचार वाजता मिनी थिएटरमध्ये ’30 जानेवारी 1948′ हा माहितीपट दाखवला जाईल. 5 वाजून 18 मिनिटांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके दिवसभर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

Pune Program Against CAA NCR

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *