पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव भिंत दुर्घटना बिल्डरांच्या चुकीनेच : COEP चा ठपका

Pune wall collapse COEP report of Ambegaon and Kondhwa wall collapse, पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव भिंत दुर्घटना बिल्डरांच्या चुकीनेच : COEP चा ठपका

पुणे : पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव इथल्या संरक्षक भिंत दुर्घटनाप्रकरणात बिल्डर्सच दोषी असल्याचा ठपका, पुण्यातील सीओईपी अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. या दोन्ही घटना बांधकाम व्यवसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे  घडल्याचं सीओईपीच्या अहवालात म्हटलं आहे.

बांधकामाचा दर्जा निकृष्ट आणि रचनेत दोष असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय सीमाभिंतीचा उर्वरित भाग तातडीने उतरविण्याची गरज असल्याचं सीओईपीने अहवालात सांगितलं आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम खात्याला हा अहवाल सादर करण्यात आला आहे. सीओईपीचा हा अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे.

Pune wall collapse COEP report of Ambegaon and Kondhwa wall collapse, पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव भिंत दुर्घटना बिल्डरांच्या चुकीनेच : COEP चा ठपका

कपाऊंड वॉलच्या मागे असलेल्या झाडांमुळेही भिंतीला तडे गेले, त्यामुळे सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत धोकादायक ठरली, असं या अहवालात म्हटलं आहे.

Pune wall collapse COEP report of Ambegaon and Kondhwa wall collapse, पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव भिंत दुर्घटना बिल्डरांच्या चुकीनेच : COEP चा ठपका

तर कोंढव्यातील भिंतीला पूर्णत: तडा गेल्याचं निदर्शनास आलं असून, ती धोकादायक स्थिती आढळली.

पुण्यातील कोंढवा भागात 29 जून रोजी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजूर तर तीन मुलांचा समावेश होता. कोंढव्यातील तालाब मशीदीजवळील कंपनीसमोर ही दुर्घटना घडली. सर्व मृत मजूर हे बिहारमधील होते.

त्यानंतर अवघ्या दोन दिवसात 1 जुलैच्या रात्री पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. तर तीन जण जखमी झाले होते. आंबेगावातील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

या दोन्ही दुर्घटनांच्या बांधकामांची चौकशी करण्याचं काम पुण्यातील नामांकित सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात COEP कडे सोपवण्यात आलं होतं. या संस्थेने अवघ्या 8 दिवसात चौकशी करुन महापालिकेला आपला अहवाल सादर केला.

संबंधित बातम्या 

पुण्यात सिंहगड कॉलेजची भिंत कोसळली, 6 मजुरांचा मृत्यू  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *