पुण्यात डम्परच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, लग्नाच्या तोंडावर काळाचा घाला

विराज निकम 19 मार्चला विवाहबंधनात अडकणार होता. मात्र लग्नाला अवघे 15 दिवस उरले असताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला Pune Youth accident before wedding

पुण्यात डम्परच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, लग्नाच्या तोंडावर काळाचा घाला
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 11:14 AM

पुणे : सिंहगड रोड परिसरात डम्परने दिलेल्या धडकेत 28 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला. लग्न अवघ्या 15 दिवसांवर आले असताना विराज निकमचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह मित्र मंडळींवर शोककळा पसरली आहे. (Pune Youth accident before wedding)

पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या नर्‍हे सर्व्हिस रोडवर काल (बुधवार 4 मार्च) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विराज आपला सहकारी प्रितेश प्रविण शहा याच्यासोबत बाईकने जात होता. त्यावेळी नवले पुल चौकाजवळ त्याच्या बाईकला डम्परने जोरदार धडक दिली.

अपघातात विराजच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा 23 वर्षीय सहकारी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

28 वर्षीय विराज निकम पुण्यातील धनकवडी परिसरात असलेल्या मानव मंदिर सोसायटीत राहत होता. त्याचा हॉटेल व्यवसाय होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 19 मार्चला विराज विवाहबंधनात अडकणार होता. मात्र लग्नाला अवघे 15 दिवस उरले असताना नियतीने अजब खेळ खेळला.

हेही वाचा : परीक्षेनंतर मित्रांसोबत पोहायला गेलेला पुण्यातील विद्यार्थी तलावात बुडाला

या घटनेमुळे निकम कुटुंबासह नातेवाईक आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune Youth accident before wedding)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.