गौतम पाषाणकर बेपत्ता होण्याचे कारण समोर, 34 दिवसात विविध शहरांत प्रवास

चुकीचं पाऊल उचलल्यास कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, या विचाराने पाषाणकरांनी आत्महत्येचा विचार सोडला

गौतम पाषाणकर बेपत्ता होण्याचे कारण समोर, 34 दिवसात विविध शहरांत प्रवास
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 6:54 PM

पुणे : गेल्या महिनाभरापासून बेपता असलेले उद्योजक गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) पुण्यात परतले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पाषाणकरांना जयपूरहून पुण्यात आणलं. बेपत्ता होण्याच्या कारणाची पोलिसांनी पाषाणकरांकडे विचारणा केली. आर्थिक नुकसानामुळे गौतम पाषाणकर नैराश्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या 34 दिवसात त्यांनी देशाच्या विविध शहरांत प्रवास केल्याचं समोर आलं आहे. (Pune’s Missing Businessman Gautam Pashankar found reasons revealed)

64 वर्षीय गौतम पाषाणकर हे तब्बल 34 दिवसांनी पुणे पोलिसांना काल (24 नोव्हेंबर) जयपुरातील एका हॉटेलमध्ये सापडले. व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून पाषाणकर बेपत्ता झाले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे बेपत्ता होण्याच्या कारणांची चौकशी केली.

गौतम पाषाणकर का बेपत्ता झाले?

व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानामुळे गौतम पाषाणकर नैराश्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळेच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. 21 ऑक्टोबरला त्यांनी पुणे सोडलं. दरम्यानच्या काळात ते भारताच्या विविध शहरांमध्ये हिंडले. अखेर पुणे क्राईम ब्रांचच्या युनिट 1 ने काल त्यांना जयपूरमध्ये शोधले.

विविध शहरांमध्ये फिरताना त्यांनी कुटुंबाचा विचार केला. आपण चुकीचं पाऊल उचलल्यास त्याच्या होणाऱ्या गंभीर परिणामांची त्यांना कल्पना आली. म्हणूनच त्यांनी आत्महत्येचा विचार सोडला. याशिवाय त्यांच्या बेपत्ता होण्यामागे दुसरे कोणतेही कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील जयपूर येथून त्यांना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते.

पाषाणकर हे 21 ऑक्टोबर, बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता.

पाषाणकरांचे नातेवाईक, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Pune’s Missing Businessman Gautam Pashankar found reasons revealed)

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट

गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली होती. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला होता.

पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी वडिलांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. पाषाणकर यांच्या गायब होण्यात राजकीय व्यक्तीचा हात असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला होता. पोलिसांची भेट घेऊन त्यांनी काही राजकीय व्यक्तींची नावेही सांगितली होती.

संबंधित बातम्या :

बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर अखेर पुण्यात, पोलिसांसह जयपूरहून परत, 34 दिवसांनी घर गाठणार

पुणे पोलिसांना मोठं यश, सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर राजस्थानात सापडले

(Pune’s Missing Businessman Gautam Pashankar found reasons revealed)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.