राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे असावे : राहुल गांधी

पुणे : प्रश्न विचारायला हवेत, काही प्रश्नांना उत्तरं देताना अडचणी येतील, काही प्रश्नांची उत्तरं नसतील, मात्र प्रश्नांना सामोरं जायला हवं, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्नांना सामोरं का जात नाहीत? असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात सवाल उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय विषयांसह वैयक्तिक विषयांवरही राहुल […]

राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे असावे : राहुल गांधी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

पुणे : प्रश्न विचारायला हवेत, काही प्रश्नांना उत्तरं देताना अडचणी येतील, काही प्रश्नांची उत्तरं नसतील, मात्र प्रश्नांना सामोरं जायला हवं, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्नांना सामोरं का जात नाहीत? असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात सवाल उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय विषयांसह वैयक्तिक विषयांवरही राहुल गांधी यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. निवडक विद्यार्थ्यांनी थेट राहुल गांधी यांना प्रश्न विचारले.

या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सॅम पित्रोदा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांसह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

हजारो लोकांशी चर्चा करुन जाहीरनामा तयार : राहुल गांधी

काँग्रेसने अत्यंत विचारपूर्वक जाहीरनामा तयार केला आहे. जाहीरनाम्यासाठी हजारो लोकांशी चर्चा केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी भारतातील रोजगाराची परिस्थितीही मांडली. आजच्या घडीला प्रत्येक 24 तासाला 27 हजार जणांच्या नोकऱ्या जात आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय किती असावे? राहुल म्हणतात…

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक विद्यार्थ्याने राहुल यांना प्रश्न विचारला की, “राजकारणात निवृत्ती असावी का? आणि असली तर किती वय असावे?” या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी विद्यार्थ्यांनाच प्रतिप्रश्न केला आणि म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं, राजकीय नेत्यांच्या नेवृत्तीचं वय किती असावं?”

त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी उत्तरं आली. त्यावेळी राहुल गांधी  म्हणाले, “मला वाटतं राजकारणात निवृत्ती असावी आणि 60 वर्षे हे राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचं वय असावं.”

LIVE UPDATE :

  • राजकारणात निवृत्तीचं वय असायला हवं. 60 वर्ष हे राजकीय निवृत्तीचं वय असू शकतं – राहुल गांधी
  • सोशल मीडियासारख्या व्हर्च्युअल आयुष्यात कितीही राहा, पण खऱ्या जीवनापासून पळू शकत नाही – राहुल गांधी
  • आम्ही भारतात नवीन रुग्णालय सुरु करणार – राहुल गांधी
  • राहुल गांधीच्या दौऱ्यात ‘मोदी मोदी’चे नारे
  • मला नरेंद्र मोदी आवडतात, नरेंद्र मोदींविषयी कोणताही राग,द्वेष मनात नाही – राहुल गांधी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे प्रश्नांना सामोरे का जात नाहीत? – राहुल गांधी
  • पाकिस्तानमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय वायुसेनेला – राहुल गांधी
  • महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवणार – राहुल गांधी
  • ग्रामीण भागात 10 लाख रोजगार देणार – राहुल गांधी
  • नोटाबंदी भारतासाठी आपत्ती – राहुल गांधी
  • अनिल अंबानीना 30 हजार कोटी दिले, त्यांनी किती जणांना नोकऱ्या दिल्या – राहुल गांधी
  • राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय गरजेचे. त्यासाठी रणनीती गरजेची असते, नियोजन आयोग रणनीती ठरवतं, तर नीती आयोग क्लृप्त्या लढवतं. – राहुल गांधी
  • आपण काय करायला हवं, याचं नियोजन करणाऱ्या संस्थेची भारताला गरज आहे, त्यामुळे नियोजन आयोगाचीही गरज आहे – राहुल गांधी
  • 72 हजार रुपयांचं आश्वासन आम्ही खूप रिसर्च करुन दिलंय – राहुल गांधी
  • भारतात 27 हजार नोकऱ्या प्रत्येक 24 तासाला कमी होत आहेत, बेरोजगारी वाढतेय – राहुल गांधी
  • हजारो लोकांशी चर्चा करुन काँग्रेसने जाहीरनामा तयार केलाय – राहुल गांधी
  • जर तुम्ही सत्य स्वीकारलात, तर धाडस मिळतं – राहुल गांधी
  • जेव्हा एखादी गोष्ट करण्याची मी ठरवतो, ते मी करतोच, हा माझा स्वभाव आहे – राहुल गांधी
  • हजारो लोकांशी चर्चा करुन काँग्रेसने जाहीरनामा तयार केलाय – राहुल गांधी
  • पुण्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राहुल गांधींची थेट उत्तरं
  • अभिनेता सुबोध भावे आणि रेडिओ जॉकी मलिष्का यांचे प्रश्न आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उत्तरं
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
  • अभिनेता सुबोध भावे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जीवनावर बायोपिक करणार, पुण्यातील कार्यक्रमात घोषणा
  • काँग्रेस नेते सॅम पित्रोदा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम
  • अभिनेता सुबोध भावे पुण्यात राहुल गांधींच्या व्यासपीठावर, सुबोध भावे राहुल गांधींवर बायोपिक करणार

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार विदर्भात प्रचार करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचाराला गुरुवारपासून सुरुवात झाली. राहुल गांधी आज सकाळी 11 वाजता पुण्यातील मगरपट्टा सिटीत लक्ष्मी लॉन येथे विद्यार्थ्यांशी बोलतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ते चंद्रपूर येथे जाहीर सभा घेतील. शेवटी सायंकाळी 4.30 वाजता वर्धा येथे प्रचारसभेला संबोधित करतील. या कार्यक्रमासह राहुल गांधींचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा संपेल.

विशेष म्हणजे वर्ध्यात होणारी राहुल गांधींची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या मैदानावरच होणार आहे. वर्ध्यात काँग्रेसकडून चारुलता टोकस तर भाजपाकडून विद्यमान खासदास रामदास तडस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 मध्ये निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील सर्व जागा गमावल्या होत्या. यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गेल्या महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीही राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौरा केला होता.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....