लोणावळ्यात पाकिस्तान जिंदाबादची घोषणा, टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा

पुणे : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जातोय. प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलेलं असताना पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात हा संताप आणखी वाढवणारी एक घटना घडली. एका रेल्वे कर्मचाऱ्याने शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केली. यानंतर या टीसीला पकडून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्याचं तातडीने निलंबनही करण्यात …

Current News Report, लोणावळ्यात पाकिस्तान जिंदाबादची घोषणा, टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा

पुणे : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जातोय. प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलेलं असताना पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात हा संताप आणखी वाढवणारी एक घटना घडली. एका रेल्वे कर्मचाऱ्याने शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केली. यानंतर या टीसीला पकडून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्याचं तातडीने निलंबनही करण्यात आलं.

उपेंद्र कुमार श्रीवीर बहादूरसिंग असं या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो मूळचा बिहारमधील असून लोणावळा स्थानकात कामाला होता. देशविरोधी घोषणा देणाऱ्या या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली. पोलिसांनी कठोर कारवाईचं आश्वासन देत जमावाला शांत केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *