UPDATE : आधी राज ठाकरेंची सभा रद्द, मग आरती रद्द, नंतर पुन्हा आरतीचं नियोजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune Rally)  यांच्या पहिल्या जाहीर सभेचा 9 चा मुहूर्त हुकला. राजगर्जनेपूर्वी (Raj Thackeray Pune Rally)  पुण्यात मेघगर्जना झाल्याने सभास्थळ पाण्याने भरलं.

UPDATE : आधी राज ठाकरेंची सभा रद्द, मग आरती रद्द, नंतर पुन्हा आरतीचं नियोजन

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune Rally)  यांच्या पहिल्या जाहीर सभेचा 9 चा मुहूर्त हुकला. राजगर्जनेपूर्वी (Raj Thackeray Pune Rally)  पुण्यात मेघगर्जना झाल्याने सभास्थळ पाण्याने भरलं. परिणामी मनसेची 9 तारखेची पहिली सभा रद्द करावी लागली. दरम्यान, राज ठाकरे आज सकाळी 10 वा पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची आरती (Kasba Ganpati Aarti) करणार होते. पुण्यातील मनसे उमेदवारांना घेऊन राज ठाकरे कसबा गणपतीची आरती करणार होते. मात्र सभेपाठोपाठ आरतीही रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. पण पुन्हा राज ठाकरे हे 10.30 वाजता आरतीला येणार असल्याची माहिती देण्यात आली.  राज ठाकरे पुण्यातील 4 उमेदवार घेऊन कसबा गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत.

त्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत राज यांच्या आज दोन सभा होणार आहेत. गोरेगाव आणि खार इथं आज संध्याकाळी या संभाव्य सभा आहेत.

पुण्यातील सभा रद्द

राज ठाकरेंची पुण्यात आयोजित केलेली पहिलीच सभा पावसामुळे रद्द झाली. राज ठाकरेंच्या सभास्थळी पावसामुळे पाणी (Raj Thackeray Pune Rally) साचलं . पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सभा (Raj Thackeray Pune Rally) होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर सभा रद्द करावी लागली.

पहिल्या सभेसाठी लकी नंबर

पहिल्या सभेसाठी मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो. त्यामुळे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नऊ तारखेचा मुहूर्त मनसे निश्चितच चुकवणार नाही असं चित्र होतं. पण पावसामुळे हा मुहूर्त हुकला.

मनसेला आघाडीचा पाठिंबा

कोथरुड मतदारसंघातून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात मनसेने किशोर शिंदे यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुण्यात मनसेला पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या 

‘राज’गर्जनेपूर्वी पुण्यात मेघगर्जना, मनसेची पहिलीच सभा रद्द

पुण्यात ‘राज’गर्जना घुमण्यात अडचण, राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *