पुण्यात बर्गरमध्ये काचेचे तुकडे सापडले

पुणे : लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण पिझ्झा, बर्गर यांसारख्या फास्टफूडच्या पदार्थांना प्राधान्य देतात. अनेकदा आपण हे पदार्थ मोठ्या चवीने खात असतो. मात्र गेल्या आठवड्यात पुण्यातील एका बर्गर किंगच्या आऊटलेटच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे सापडले आहेत. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील डेक्क्न जिमखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात साजित पठान (31) आपल्या मित्रांसोबत पुण्यातील बर्गर …

पुण्यात बर्गरमध्ये काचेचे तुकडे सापडले

पुणे : लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण पिझ्झा, बर्गर यांसारख्या फास्टफूडच्या पदार्थांना प्राधान्य देतात. अनेकदा आपण हे पदार्थ मोठ्या चवीने खात असतो. मात्र गेल्या आठवड्यात पुण्यातील एका बर्गर किंगच्या आऊटलेटच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे सापडले आहेत. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील डेक्क्न जिमखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात साजित पठान (31) आपल्या मित्रांसोबत पुण्यातील बर्गर किंगच्या एका आऊटलेटमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी बर्गर, फ्रेंच फ्राईज, आणि सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केले. फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर त्यांनी बर्गर खाण्यास सुरुवात केली. बर्गरचा एक घास खाल्ल्यानंतर साजित यांना घशात टोचल्यासारखे झाले. अचानक त्यांच्या तोंडातून रक्त आले.

घशात काही अडकले असावे, या शक्यतेमुळे साजितच्या मित्रांनी त्यांना पाणी दिले. काही वेळानंतर साजितच्या मित्रांची नजर त्यांच्या बर्गरवर गेली असता, त्यांना बर्गरमध्ये काचेचे तुकडे सापडले. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. साजित पठान हे पुण्यात रिक्षा चालकाचा व्यवसाय करतात.

याप्रकरणी साजित पठान यांनी बर्गर किंग विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी रुग्णालयातून याबाबचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान याप्रकरणी बर्गर किंगचे मॅनेजर सिद्धार्थ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगितले.

आपण सर्वजण पालेभाज्या, फळभाज्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करत सर्रास मॅक्डोन्ल्ड, बर्गर किंग, डॉमिनॉज या ठिकाणी जाऊन फास्ट फूड खाणं पसंत करतो. मात्र हे फास्टफूड खाण्याआधी थोडीशी सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *