तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करु, संभाजी ब्रिगेडची काकडेंना ऑफर

पुणे: संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. तशी तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे.  संभाजी ब्रिगेडच्यावतीने अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना पुण्यातून उमेदवारी देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडची आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. “सध्या संजय काकडे हे …

तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करु, संभाजी ब्रिगेडची काकडेंना ऑफर

पुणे: संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. तशी तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे.  संभाजी ब्रिगेडच्यावतीने अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना पुण्यातून उमेदवारी देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडची आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.

“सध्या संजय काकडे हे उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी करत आहेत. पण काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही, भाजपला संजय काकडे यांची किंमत नाही, आणि काँग्रेस संजय काकडे यांना स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ संजय काकडेंनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ‘संभाजी ब्रिगेड’ मध्ये सहभागी व्हावं आणि कर्तुत्वान खासदार संजय काकडेंनी ‘संभाजी ब्रिगेड’कडून लोकसभा निवडणूक लढवावीठ, अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

‘संभाजी ब्रिगेड’ची संपूर्ण निष्ठावंत ताकत संजय काकडेंच्या पाठीशी उभी करायला तयार आहे. आम्ही रक्ताचं पाणी करुन संजय काकडे यांच्या पाठीशी उभं राहू, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं.

संजय काकडे यांनी संभाजी ब्रिगेडचा विचार करून  लोकसभेची तयारी करावी आणि आपली फरफट थांबवावी, असं आवाहन  संभाजी ब्रिगेडने केलं आहे.

संजय काकडेंसाठी व्याही सुभाष देशमुखांची मध्यस्थी

निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातील रुसवे – फुगवे दूर करण्यासाठी आता नात्या – गोत्यांचा आधार घेतला जात आहे. संजय काकडे यांना भाजपमध्ये थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे खासदार संजय काकडेंना घेऊन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानी दाखल झाले. सुभाष देशमुख संजय काकडेंचे व्याही आहेत.  संजय काकडेंच्या मुलीशी सुभाष देशमुखांच्या धाकट्या मुलाचं मागच्याच वर्षी लग्न पार पडलं होतं.

संजय काकडे काँग्रेसमध्येच जाणार

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर संजय काकडे यांनी मुख्यमंत्री हे आपले मित्र आहेत, पण आता काँग्रेस प्रवेश ठरला आहे, असं सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *