गुण आणि वेळ किती? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा फॉर्मेट ठरला

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Pune University Exam) आहे.

गुण आणि वेळ किती? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा फॉर्मेट ठरला

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Pune University Exam) आहे. लॉकडाऊनमुळे विद्यापीठांच्या परिक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षा होणार याबाबत सांगितले होते. आता या परीक्षेचा फॉर्मेट विद्यापीठाकडून ठरवण्यात आला आहे. ऑफलाईन परीक्षेत 50 गुण असतील आणि परीक्षेची वेळ दीड तास असणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाने दिली (Pune University Exam) आहे.

यूजीसीच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेतल्या जाणार आहेत. परीक्षा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने पाच समित्या नेमल्या असून यांच्यामार्फत कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पदवीच्या अंतिम वर्षाचा आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षाच्या परिक्षेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये अभ्यासक्रमातील 30 टक्के भागाचे ई-साहित्यही तयार केले जाणार आहे.

नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबाबत परिक्षपत्रक जारी केल होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, किती गुणांची परीक्षा असेल हे ठरविण्यासाठी विद्याशाखांच्या समितींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय होईल.”

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, उदय सामंत यांचे यूजीसीला पत्र

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर जात असल्याने काहीदिवसांपूर्वीच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचे पत्र यूजीसीला लिहिलं होते.

“यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा. ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या,” असं पत्र उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला लिहिलं होते.

संबंधित बातम्या :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर, बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांचे यूजीसीला पत्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *