'मावळचा मतदारसंघ पवारांनी नातवाला चॉकलेट म्हणून दिला'

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी रविवारी (21 एप्रिलला) पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ही लोकसभा निवडणूक म्हणजे नातवाचे लाड पुरवणारी निवडणूक झाली आहे. मावळचा मतदारसंघ तर पवारांनी नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला. पुण्यातून भाजप-शिवसेना युतीकडून गिरीश बापट, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोहन जोशी, तर वंचित बहुजन …

'मावळचा मतदारसंघ पवारांनी नातवाला चॉकलेट म्हणून दिला'

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी रविवारी (21 एप्रिलला) पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ही लोकसभा निवडणूक म्हणजे नातवाचे लाड पुरवणारी निवडणूक झाली आहे. मावळचा मतदारसंघ तर पवारांनी नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला. पुण्यातून भाजप-शिवसेना युतीकडून गिरीश बापट, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोहन जोशी, तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव निवडणूक मैदानात आहेत.

सध्याचे राजकारण थट्टा मस्करीचे झाल्याचे मत व्यक्त करत आंबेडकरांनी पार्थ पवार यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘वंचितांना आव्हान देत मावळचा मतदारसंघ चॉकलेट म्हणून वापरण्यात येत आहे. तो आता नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला आहे.’

‘उद्याची सत्ता ‘रेव्ह पार्टी’ करणाऱ्यांच्या हातात देणार का?’

प्रकाश आंबेडकरांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मावळ मतदारसंघ कुणाची जहागिरी नसल्याचे म्हणत त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिले. आंबेडकरांनी पार्थ पवार यांना लक्ष्य करत उद्याची सत्ता रेव्ह पार्टी करणाऱ्यांच्या हातात देणार का? असा जहरी प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आक्रमक टीका केली आहे. त्यांनी आधीपासून काँग्रेसबाबत काहीसे सौम्य धोरण घेतले, मात्र राष्ट्रवादी सुरुवातीपासूनच त्यांच्या हिटलिस्टवर राहिली. आता त्यांनी पुण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केले.

पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होत आहे. या दिवशी पुण्यासह महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *