मावळमध्ये शिवसेना-भाजपाची ताकद, पार्थ पवारांची भिस्त शेकापवर

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. या दुसऱ्या यादीत मावळमधून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ हा अर्धा पुणे आणि अर्धा रायगड जिल्ह्यामध्ये विभागला गेलाय. यामुळे पार्थ पवार यांची रायगडमधील सर्व जबाबदारी ही शेतकरी कामगार पक्षाने घेतली …

मावळमध्ये शिवसेना-भाजपाची ताकद, पार्थ पवारांची भिस्त शेकापवर

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. या दुसऱ्या यादीत मावळमधून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ हा अर्धा पुणे आणि अर्धा रायगड जिल्ह्यामध्ये विभागला गेलाय. यामुळे पार्थ पवार यांची रायगडमधील सर्व जबाबदारी ही शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे.

शेतकरी कामगार पक्षाची रायगडमध्ये चांगली ताकद आहे. शिवाय शेकापच्या बाळाराम पाटील यांना कोकण शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली होती. याची परतफेड शेकाप पार्थ पवार यांना मदत करून करणार आहे. यासाठी शेकापने पनवेलमध्ये पार्थ पवार यांचा प्रचारही सुरू केलाय.

अजित पवारांनीही दोन दिवसांपूर्वीच पनवेल मतदारसंघाचा आढावा घेतला होता. शिवाय उमेदवार नवखा असेल, सांभाळून घ्या, असं आवाहनही केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे शेकापच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेत आहेत. यामुळेच शेकापने पार्थ पवारांच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. इतर कुठल्या पक्षाला आतून पठिंबा द्यायचा असेल तर त्याने खुशाल द्यावा, असा चिमटाही बाळाराम पाटील यांनी भाजपला काढलाय.

मावळ मतदारसंघाचं समीकरण

मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झाला आहे. याची भोगोलिक परिस्थिती पाहता हा मतदारसंघ हा मतदारांशी सवांद साधण्यासाठी अतिशय अवघड असा आहे.

कोणत्या मतदारसंघात कुणाचा आमदार

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड, पुणे आणि मावळमध्ये शिवसेना भाजपाची ताकद आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची सर्व भिस्त आता रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघांवर असल्याचं बोललं जातंय. यामध्येही पनवेलमध्ये भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची पकड आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत एकत्र लढलेल्या शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादीवर भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *