‘भोसरी’वरुन युतीत वाद, महेश लांडगेंविरुद्ध कोण? शिवसेनेकडून जागेवर दावा

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युती (BJP Shivsena Alliance) झाली आहे. मात्र, वारंवार भाजप-शिवसेनेत खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

'भोसरी'वरुन युतीत वाद, महेश लांडगेंविरुद्ध कोण? शिवसेनेकडून जागेवर दावा
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेते
Follow us
| Updated on: Sep 10, 2019 | 10:10 AM

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युती (BJP Shivsena Alliance) झाली आहे. मात्र, वारंवार भाजप-शिवसेनेत खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सरकारच्या कामावर ताशेरे ओढत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे इतर नेते जागावाटपावरून भाजपला आव्हान देत आहेत. असाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchawad) घडला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी भोसरी मतदारसंघावर (Bhosari Constituency) दावा केला आहे.

विधानसभा जागावाटपात भाजप पुण्यातही 8 जागा मागत आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांनी मग फक्त झेंडेच उचलायचे का? असा सवाल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. त्यामुळे जागावाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद होणार असल्याचं स्पष्ट आहे. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “पुण्यातील विधानसभा जागांवरुन भाजप-शिवसेनेत वाद होण्याची चिन्हे आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ मुळचा शिवसेनेकडे आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत युती असताना भोसरी शिवसेनेच्या वाट्याला होती. 2014 मध्ये सेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.”

यापूर्वी या मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार आणि आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास भोसरी मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असेल, अशी माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. भोसरीतून शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी तलवार उपसली आहे. दुसरीकडे लांडगे यांनी आधीपासूनच भोसरीत ठिकठिकाणी कमळाच्या चिन्हासह फ्लेक्सबाजी करत प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुलभा उबाळे विरुद्ध भाजपचे महेश लांडगे अशी लढत झाल्यास विशेष वाटायला नको.

पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा

लोकसभेला पराभव झालेल्या आढळरावांनी युतीचे सर्व आमदार निवडून आणण्याची तयारी सुरु केली आहे. जुन्नर,खेड हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे, शिरुर भाजपकडे तर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. मात्र गेल्या चार वर्षात खेड मतदारसंघावर भाजपाची एक स्वतंत्र पकड वाढली आहे.

भोसरी,खेड-आळंदी, भोसरी,आंबेगाव, जुन्नर या विधानसभा मतदार संघामधून जाणारा पुणे नाशिक महामार्ग कायम वाहतुकीच्या कोंडीमुळे सापडलेला असतो हा एक मोठा प्रश्न या विधानसभा  मतदारसंघांमध्ये कायम गाजत आलेला आहे. तर शिरूर विधानसभा मतदारसंघांमधील ही पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची झालेले आहे. त्यामुळे हा मुद्दादेखील येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये गाजू शकतो.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यत बंदीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात गाजलेला समोर आला आहे. शिरूर,चाकण या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे प्रश्न असतील किंवा कंपनी चालकांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतील.

भोसरी विधानसभा मतदारसंघ

भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ. हा पिंपरी-चिंचवडमधील शहरी भागामधला एक विधानसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमधील हा सर्वाधिक लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ आहे. महेश लांडगे यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात त्यांचे पारडे जड आहे. पण भाजपचे निष्ठावान पक्षनेते एकनाथ पवार यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध महेश लांडगे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या रूपाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध वापरून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

तर दुसरीकडे हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहे आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वलय आणि लोकप्रियता हे दोन्हीही मतदारसंघांमध्ये वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला ही चांगलीच मदत होण्याची शक्यता आहे. युती झाली तर हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची अधिक शक्यता आहे. पण युती झालीच नाही तर सेनेकडून पुन्हा सुलभा उबाळे किंवा राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन विकास आघाडीनेही ही या मतदारसंघात लक्षणीय मते घेतली असल्यामुळे, त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.

दरम्यान महेश लांडगे यांची लोकप्रियता असली तरी मतदारसंघातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न असेल किंवा रेड झोनमध्ये येणाऱ्या अनधिकृत घरांचा प्रश्न त्याचबरोबर सरसकट शास्ती कर माफ करण्याचा मुद्दा महेश लांडगे यांच्यासाठी मोठा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

2014 चा निकाल

  • महेश लांडगे, विजयी- अपक्ष भाजप संलग्न
  • प्रमुख विरोधक-सुलभा उबाळे(शिवसेना)
  • विलास लांडे(राष्ट्रवादी काँग्रेस)

विधानसभा 2014 निवडणूक आकडेवारी

  • *अपक्ष-60173 विजयी उमेदवार
  • *शिवसेना-44857
  • *राष्ट्रवादी काँग्रेस-44211
  • *भाजप-43626
  • *काँग्रेस -14363
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.