पिंपरीत तरुणाची दादागिरी, भररस्त्यात 23 वर्षीय तरुणीची कॉलर पकडली

पुणे : कारला धडक दिल्याच्या रागातून तरुणाने चक्क तरुणीची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. विशेष म्हणजे या तरुणाला त्याच्या आईनेही साथ दिल्याचं बोललं जातंय. तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दोघींना ‘पाहून घेतो’ म्हणून धमकीही दिली. याप्रकरणी स्वरुपा लोढा आणि मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल …

पिंपरीत तरुणाची दादागिरी, भररस्त्यात 23 वर्षीय तरुणीची कॉलर पकडली

पुणे : कारला धडक दिल्याच्या रागातून तरुणाने चक्क तरुणीची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. विशेष म्हणजे या तरुणाला त्याच्या आईनेही साथ दिल्याचं बोललं जातंय. तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दोघींना ‘पाहून घेतो’ म्हणून धमकीही दिली. याप्रकरणी स्वरुपा लोढा आणि मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 23 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

दर्शन लोढा याने चारचाकी गाडीला धडक दिली असं म्हणून पीडित फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली. चावी घेतल्याची फिर्यादी यांनी विचारणा केली असता दर्शन लोढा याने अश्लील शिवीगाळ केली. तुझ्या सारख्या मुली खूप पहिल्या आहेत, असं म्हणत फिर्यादी तरुणीच्या कॉलरला पकडून जवळ ओढून घेत हाताला हिसका दिला.

तेवढ्यात दर्शन लोढा याची आई स्वरुपा यांनी तरुणीला आणि त्यांच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ केली आणि आम्ही कायदा ओळखतो, आमचे पोलीस ठाण्यात आणि कोर्टात रोजचे येणं जाणं आहे, तू आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करशील, त्या पलीकडे काय करणार, तेव्हा आम्ही दोघे तुला बघून घेऊ, अशी धमकी फिर्यादी यांना दिली.

घटनेनंतर स्वरूपा यांनी तक्रारदार तरुणीचा रस्ताही अडवला. यानुसार चिंचवड पोलीस अधिक तपास करत असून आई आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपीची रवानगी येरवडा तुरुंगात झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *