भरधाव एसटीने 9 जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेची फाशी रद्द

पुणे: स्वारगेट डेपोतून भरधाव एसटी घेऊन, 9 जणांना चिरडणाऱ्या एसटी चालक संतोष मानेची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाने फाशीऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे संतोष मानेला आयुष्यभर जेलमध्येच काढावे लागणार आहेत.  संतोष मानेने 2012 मध्ये स्वारगेट डेपोची बस पळवून नऊ जणांना बसखाली चिरडले होते. त्यामुळे पुणे कोर्टाने 2013 मध्ये  संतोष मानेला फाशीची शिक्षा दिली …

भरधाव एसटीने 9 जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेची फाशी रद्द

पुणे: स्वारगेट डेपोतून भरधाव एसटी घेऊन, 9 जणांना चिरडणाऱ्या एसटी चालक संतोष मानेची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाने फाशीऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे संतोष मानेला आयुष्यभर जेलमध्येच काढावे लागणार आहेत.  संतोष मानेने 2012 मध्ये स्वारगेट डेपोची बस पळवून नऊ जणांना बसखाली चिरडले होते. त्यामुळे पुणे कोर्टाने 2013 मध्ये  संतोष मानेला फाशीची शिक्षा दिली होती. कोर्टामध्ये संतोषच्या विरुद्ध सरकारी संपत्तीचे नुकसान आणि दहशत पसरविण्याचे आरोप लावले होते. ही फाशी हायकोर्टाने कायम ठेवली होती.

25 जानेवारी 2012 रोजी मनाप्रमाणे ड्युटी मिळत नसल्याने, नाराज झालेल्या संतोषने स्वारगेट डेपोतून बस चोरुन भरधाव वेगात चालवत असताना रस्त्यावरील नऊ जणांना त्याने बसखाली चिरडले होते. तसंच त्याने 41 गाड्यांना ठोकर दिली होती. या प्रकरणात कोर्टाने संतोषला 9 लोकांची हत्या केल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावली होती.

मात्र माने यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याचा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे शिक्षा रद्द करण्याची मागणी पुणे कोर्टात केली होती.  संतोष मानेने मानसोपचार तज्ज्ञांकडून दोन अहवाल कोर्टात सादर केले होते.  मात्र कोर्टाने हे दोन्ही अहवाल अमान्य केले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *