VIDEO : आधी तलवारबाजी; आता फलंदाजी; सुप्रिया सुळेंची बॅटिंग!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केवळ एक राजकारणी नाहीत. तर त्यांच्यात अनेक छुपे गुण आहेत. जे त्या वेळप्रसंगी दाखवत असतात. काहीच दिवसांआधी त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपले तलवारबाजीचे कसब दाखवले. हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी चक्क तलवारबाजी केली होती. तलवारबाजी नंतर आता त्यांच्यातील …

VIDEO : आधी तलवारबाजी; आता फलंदाजी; सुप्रिया सुळेंची बॅटिंग!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केवळ एक राजकारणी नाहीत. तर त्यांच्यात अनेक छुपे गुण आहेत. जे त्या वेळप्रसंगी दाखवत असतात. काहीच दिवसांआधी त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपले तलवारबाजीचे कसब दाखवले. हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी चक्क तलवारबाजी केली होती.

तलवारबाजी नंतर आता त्यांच्यातील आणखी एक गुण समोर आला आहे. तो म्हणजे क्रिकेटचा. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात काँग्रेसकडून वीस वर्षाखालील महिला क्रिकेट करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर बॅट हातात घेत आपल्यातील फलंदाजीचे कौशल्य दाखवले. तसेच त्यांनी गोलंदाजीही केली. सुप्रिया सुळेंना साडीमध्ये फलंदाजी करताना बघून तेथील सर्वच आश्चर्यचकित झाले.

यावेळी सुप्रिया सुळेंना माध्यमांनी माधूुरी दीक्षितबाबत प्रश्न विचारले असता, “पुण्यातून कुणीही उभं राहिलं, तरी त्यांना माझ्या शुभेच्छा”, असे उत्तर त्यांनी दिले.

भाजप माधुरी दीक्षितला पुण्यातून उमेदवारी देण्याची चर्चा आहे. मात्र माधुरीने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. तर भाजपने अजून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *