अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, 26 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे (Timetable of 11th Admission process).

अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, 26 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे निकाल रखडले असले, तरी अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे (Timetable of 11th Admission process). यानुसार 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारुप Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आणि पालकांना अचूकपणे अर्ज भरण्यास मदत होणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या अर्जात भरलेली माहिती 24 जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी 16 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालेल. Mock.Demo.Registration या संकेतस्थळाचा याचा उपयोग करता येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

CBSE बोर्ड दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, बोर्डाचं स्पष्टीकरण

CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

संंबंधित व्हिडीओ:


Timetable of 11th Admission process

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *