लवकरच 900 हून अधिक जागांची भरती, उदय सामंतांची घोषणा

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाला भेट दिली (Uday Samant announce recruitment).

लवकरच 900 हून अधिक जागांची भरती, उदय सामंतांची घोषणा

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाला भेट दिली (Uday Samant announce recruitment). यावेळी त्यांनी लवकरच 900 हून अधिक जागांची भरती करणार असल्याचं जाहीर केलं. विद्येच्या माहेर घरातून कामकाजाला सुरुवात व्हावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिल्याचंही यावेळी सामंत यांनी सांगितलं (Uday Samant announce recruitment).

उद्य सामंत म्हणाले, “सावित्रीबाई फुले विद्यापीठात 1 महिन्याच्या आत 111 जागांसाठी जाहिरात निघेल. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व जागा भरण्यात येतील. वित्त आणि महसूल विभागाशी संबंधित 800 जागा भरायच्या आहेत. यासाठी देखील लवकरच अजित पवार यांच्याशी बैठक घेईल. नाशिक आणि अहमदनगर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रांची मागणी आहे. येत्या 15-20 दिवसांमध्ये नाशिक, अहमदनगर उपकेंद्रांचा जीआर निघेल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकला 2 महिन्यात उपकेंद्रांच्या जागेचं भूमिपूजन होईल.”

यावेळी सामंत यांनी कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या एका तासात मान्य केल्याचंही नमूद केलं.

‘गावागावात ग्रंथालय’

मागील सरकारने 2012 पासून एकही ग्रंथालयाला मान्यता दिली नाही. ग्रंथालयांच्या मान्यतांना स्थगिती देण्यात आली होती. आता आम्ही लवकरच ही स्थगिती उठवणार आहोत, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली. 5 हजारहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावात ग्रामपंचायतची ग्रंथालयं सुरू केली जातील. तसेच तिथं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र चालवली जातील, असंही सामंत यांनी नमूद केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *